आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यात धडक मोर्चा, पोलीस आयुक्तालयाला लावणार ताळे?

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाची (thackeray group) महिला कार्यकर्ती रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना वादग्रस्त पोस्ट प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. सदर घटनेचा व्हिडिओ ही समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यात धडक मोर्चा, पोलीस आयुक्तालयाला लावणार ताळे?

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाची (thackeray group) महिला कार्यकर्ती रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना वादग्रस्त पोस्ट प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. सदर घटनेचा व्हिडिओ ही समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. सदर पीडित महिला ठाण्यातील चरई येथील संपदा रुग्णालयात (Sampada Hospiata) उपचार घेत असून काल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहकुटुंब ठाण्यात येऊन रोशनी शिंदे यांचा तपास केला. एवढी घटना घडून देखील पोलीस प्रशासनाने शिंदेंच्या महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवून न घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्याचबरोबर जेव्हा ते पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले तेव्हा आयुक्त तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्याच्या गृह खात्यावर जोरदार टीका केली.

आज याप्रकरणी ठाकरे गटाकडून ठाण्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार असून हा मोर्चा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला मारहाण प्रकरणी काढण्यात येणार आहे. तर या टाळे लावा मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) करणार आहेत. या मोर्चाला काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण (Vikrant Chavan) हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकून उद्धव ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

देवेंद्र फडणवीसांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा, फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित…

“सब्जा” हे शरीरासाठी गुणकारी आणि औषधही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version