धनंजय मुंडे – देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा सागर बंगल्यावर भेट

धनंजय मुंडे यांनी उशिरा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट घेण्यात आली.

धनंजय मुंडे – देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा सागर बंगल्यावर भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता नात्याचा खेळ सुरु होता. अखेर काल भाजपच्या पाठिंब्यासोबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पाठोपाठ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आदेश येताच देवेंद्र फडणवीस यांनी ही उपमुख्यमनातरी पदाची शपथ घेतली. राज्यात नवे सरकार स्थापन झाले. लगेचच एकनाथ शिंदे गोव्याला रवाना झाले. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उशिरा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट घेण्यात आली.

दरम्यान राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट लक्षात घेता सत्ता समीकरणं बदलाचे संकेत असल्याची शंका वर्तवली जात आहे. या सर्व चर्चांवर धनंजय मुंडे यांनी आपण उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आपण फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत परतल्यावर त्यांची ही भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला “नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रीमंडळाचं स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यापासून पहिल्या दिवसापासून अडचणी निर्माण करण्यात आल्या. पण अशी कोणतीही अडचण आम्ही निर्माण करणार नाही. जनतेच्या कामांना प्राधान्य असेल. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला पुढे न्यावं याच शुभेच्छा! असं संजय राऊत म्हणाले.

2019 साली अजित पवार – देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ विधी उरकला होता. त्यांच्या संदर्भ जोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उशिरा देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीबद्दल शंका व्यक्त केली जाते आहे.

Exit mobile version