spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंडे बहिण भावात रंगली जुगलबंदी, मिश्किल शैलीत दोघांचा संवाद

बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. हे दोन्ही नेते अनेकदा विविध कार्यक्रमात एकाच मंचावर पाहायला मिळालं आहे. तसेच पुन्हा एकदा परळीमध्ये एका कार्यक्रमात दोघेही भाऊ-बहिण एकत्र आले. यावेळी बहिणीने दिलेला चेक तो बाउन्स होऊ देणार नाही, असा मिश्किल टोला धनंजय मुंडेंनी लगावला. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली. बीडच्या परळी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला. परळीची सुवर्ण कन्या श्रद्धा गायकवाड हिच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोघांनाही संयोजकांनी बोलवले होते.

हेही वाचा : 

Shiv Sena Symbol : धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला पुन्हा मिळणार?, सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष

याप्रसंही पंकजा मुंडे यांनी भाषण करतांना म्हणाल्या की, ‘श्रद्धा तुला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून ब्लॅक चेक देते. जेवढी रक्कम तिला हवी आहे. तेवढी त्यांनी टाकावी फक्त चेक बाउन्स झाला नाही पाहिजे एवढी रक्कम टाकावे’ असं म्हणत मदतीसाठी हात पुढे केले. मात्र याला उत्तर देताना धनंजय मुंडे हे म्हणाले की, ‘पंकजाताईंनी आता श्रद्धाला चेक दिला आहे. एवढं म्हणताच पंकजा मुंडेंनी ‘त्यात पैसे टाका’ असं म्हणाल्या. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली. त्यावर लगेच धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं. ‘जरी त्या अकाउंट मधील पैसे कमी पडले, तर मी टाकेल अजून ही टाकत आहे. बहिणीने चेक दिला असला तरी भाऊ तो बाऊन्स होऊ देणार नाही, काळजी करू नको’ असं म्हणत धनंजय मुंडे यांनी कोपरखळी लगावली. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.

Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ विदर्भात दाखल, एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं स्वागत करणार

याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारली होती. तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव करणारे धनंजय मुंडे जायंट किलर ठरले होते. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी पंकजा मुंडे या सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या कारभारावर टीका करत होत्या. राजकीय संघर्षासाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या दोघांमध्ये बहीण भावाचं नातं राहिलेलं नाही, अशी कबुली धनंजय मुंडे यांनी दिली होती.

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीसांच्या मध्यरात्रीच्या बैठका सुरूच; नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा

Latest Posts

Don't Miss