धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात,एअर ऍम्ब्युलन्सने होणार पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा काल मध्यरात्री अपघात झाला. सुदैवाने ते या अपघातातून बचावले आहेत,पण त्यांच्या छातीला मुका मार लागला आहे.

धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात,एअर ऍम्ब्युलन्सने होणार पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा काल मध्यरात्री अपघात झाला. सुदैवाने ते या अपघातातून बचावले आहेत,पण त्यांच्या छातीला मुका मार लागला आहे. त्याचबरोबर त्यांच्या गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मुंडेंच्या अपघाताची बातमी समजल्यानंतर कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मुंडेंच्या घराकडे धाव घेतली तर काहींनी फोनकरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत अपघाताची माहिती दिली आहे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आव्हान देखील केले आहे.

धनंजय मुंडे काल दिवभराचे कार्यक्रम आणि भेटी आटोपून रात्री परळीकडे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात मुंडे यांच्या छातीला मुका मार लागला आहे. त्याचबरोबर त्यांच्या कारचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून पुढील उपचारासाठी ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होणार आहेत.

संबंधित अपघाताची माहिती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे. त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे,”मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२. ३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये”.

त्याचबरोबर त्यांच्या कार्यकालीन ट्विटर हॅन्डल वरून देखील या बाबतची माहिती देण्यात आली आहे. या पोस्ट म्हटलं,”काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास @dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे”

हे ही वाचा:

वीज कर्मचाऱ्यांना “मेस्मा” चा धक्का,”मेस्मा” म्हणजे काय? जाणून घ्या

Mahavitaran Strike , महावितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या कोणकोणत्या आहेत ?

सर्व तयारी झाली आहे, केसरकरांनी लवकरच तुरुंगात जाण्याची करावी, संजय राऊतांच्या इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version