Saturday, September 28, 2024

Latest Posts

Dharmaveer 2 वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघे यांना मारले गेले…

‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर “धर्मवीर – २” या चित्रपटातून उलगडले आहे. दिनांक २७ सप्टेंबरला “धर्मवीर – २” हा चित्रपट प्रदर्शित झाला.

‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर “धर्मवीर – २” या चित्रपटातून उलगडले आहे. दिनांक २७ सप्टेंबरला “धर्मवीर – २” हा चित्रपट प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून या चित्रपटाचे स्क्रिनींग अनेक ठिकाणी मोफत करण्यात आले. तर, शिंदेंच्या शिवसैनिकांनी चित्रपटावर चर्चाही सुरू केली आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकांच्या (Election) तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करत शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय नेरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय.

धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. या सीनमध्ये ठाण्याच्या रुग्णालयामधून आनंद दिघे यांची डेडबॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे दाखविले आहे. ही घटना खरंच घडली होती का? त्यावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उत्तर दिले.

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संजय शिरसाट यांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले, त्यावेळी तुम्ही तोंड बंद करुन का बसला होता. आता इतक्या वर्षांनी हा विषय आणला. मग षडयंत्रात तुम्ही होता का? पुरावे असतील तर सांगा, मग मी आनंद दिघे यांचा पुतण्या कोर्टाची पायरी चढायला तयार आहे. मी सर्व राजकारण सोडून देईल, असे केदार दिघे म्हणाले.

&

काय म्हणाले संजय शिरसाट –

आनंद दिघे यांना मारले गेले हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. ते चांगले ठणठणीत होते. त्यांना दुपारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार होती. परंतु अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बोलता चालता त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टी काही काळाने पुढे येतील. त्या वेळी लोक संतापले होते. त्या हॉस्पिटला आग लावली असती. हजारो रुग्ण त्या ठिकाणी होते. त्या सर्वांना शांत करण्याचे काम शिवसैनिकांनी केले. त्यात आग्रभागी एकनाथ शिंदे होते. चित्रपटात दाखवले ते सत्य आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

संजय शिरसाट म्हणाले, चित्रपट पाहताना घटनाक्रम पाहायला हवे. काही लोकांना असे वाटते की शिवसेना त्यांच्यापासून जन्मली आहे. परंतु शिवसेना बाळासाहेबांनी बनवली आहे. दिघे साहेब यांनी जे घडवले त्यावर पाणी फिरण्याचे काम करतात. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नात आल्याचे दाखवले तर त्याला वेगळा संदर्भ लावू नका.

हे ही वाचा:

इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्र आयोजित “इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss