Tuesday, July 2, 2024

Latest Posts

‘ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो…’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन

सध्या महाराष्ट्रामध्ये वेदांत फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकरण खूप गाजत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये होणार वेदांती फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात घेऊन गेल्याची माहिती मिळाली आणि आता विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारला चांगलंच धारेवरती धरल्याचे दिसत आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये वेदांत फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकरण खूप गाजत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये होणार वेदांती फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात घेऊन गेल्याची माहिती मिळाली आणि आता विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारला चांगलंच धारेवरती धरल्याचे दिसत आहे. आज महाविकास आघाडीकरून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे. गुजरातला गेल्याने राष्ट्रवादी (ncp)काँग्रेस आज प्रचंड आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यापाठोपाठ आज मुंबईतही (mumbai) जोरदार आंदोलन केलं.

ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो… पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके… शिंदे – फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी… गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते… स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके… ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून गेला. महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात नेणार्‍या शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Nationalist Youth Congress Working President Suraj Chavan) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.

हे ही वाचा: मुंबईसह, पुण्यात राष्ट्रवादीचं सरकार विरोधात ‘लॉलीपॉप’ आंदोलन

युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात येणार होते मात्र पोलिसांनी राष्ट्रवादी भवन येथेच युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याने युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी शिंदे – फडणवीस यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी युवकांनी फलक दाखवून आणि घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

साधू मारहाण प्रकरणातील आरोपींना आज करणार न्यायालयात हजर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss