खोके सामनामध्ये पोहोचले का? मनसेचा खोचक सवाल

राज्यच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या सरकारवर खोके सरकार म्हणून ठाकरे गटाकडून वारंवार हल्ला करण्यात येतो.

खोके सामनामध्ये पोहोचले का? मनसेचा खोचक सवाल

राज्यच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या सरकारवर खोके सरकार म्हणून ठाकरे गटाकडून वारंवार हल्ला करण्यात येतो. हे सरकार बेकायदेशीर सरकार आहे, अशी टीकाही करण्यात येते. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनात शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या जाहिरातीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने (Maharashtra Navnirman Sena Party) ठाकरे गटाला चांगलंच घेरलं आहे. खोके सामनामध्ये पोहोचले का? असा सवालच मनसेकडून करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची जाहिरात सामनात छापून आल्याने त्यावरून ठाकरे गटावर टीका करण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवरून ठाकरे गटाला टोले लगावले आहेत. खोके सामनामध्ये पोहोचले का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विट करून केला आहे. सामनाचं खरं स्वरुप लोकांसमोर आलं आहे. आदित्य ठाकरे रोज सांगतात हे अनधिकृत सरकार आहे. मग या अनधिकृत सरकारची अधिकृत जाहिरात सामनात कशी? सर्व तत्त्वे बाजूला करतो आणि पैसे गोळा करतो हेच या जाहिरातीतून सिद्ध होत आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याची आदित्य ठाकरे यांनी वारंवार टीका केली आहे. मात्र त्याच शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात सामना प्रसिद्ध झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे ही वाचा :

‘शिवसेनेचा युवराज’, आदित्य ठाकरे यांच्यावरील नवं गाणं लॉन्च

By-Elections – सहा राज्यांतील ७ विधानसभांसाठी आज पोटनिवडणूक

राज्यात कापूस पिकाचे दुहेरी नुकसान, पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव भाव मिळेना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version