spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नांदेड, हिंगोली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर ?

गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाने त्याचा कहर घालण्यास सुरवात केली आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या पर्मनंट नुकसान देखील झाले आहे.

मुंबई :- गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाने त्याचा कहर घालण्यास सुरवात केली आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या पर्मनंट नुकसान देखील झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. एकीकडे मंत्रीमंडळाचा विस्तार हा रखडला आहे तर दुसरीकडे जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यामुळे शेतकरी वर्गाने आता नक्की दाद कुठे मागायची आणि कोणाकडे मागायची ? हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

महाराष्ट्रातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे शेतीचे खूप नुकसान हे झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हे दौऱ्यावर असताना त्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर पडला आहे का ? असा सवाल केला जात आहे. त्यांच्या या ८ ऑगस्ट च्या हिंगोली – नांदेड दौऱ्यामध्ये ते सकाळी ११.३० ते ११.५० वाजेपर्यंत हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे जाणार असून दुपारी गोदावरी अर्बन बँकेस भेट देणार आहेत . त्यानंतर नांदेड उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधित भागाची पाहणी आणि नंतर मेळाव्यास हजेरी लावणार आहे. तर त्यापुढे दुपारी २.३० वाजता नांदेड येथून हिंगोलीकडे निघतील. तर दुपारी ३.१५ ते ४.०० वाजता अग्रसेन चौक, नांदेड नाका, हिंगोली येथे भव्य कावड यात्रेस उपस्थिती दर्शवणार आहेत. पुढे ४.०० ते ४.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे जाणार आणि नंतर सायंकाळी ५.०० वाजता गांधी चौक, हिंगोली येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा सायंकाळी ६.३० ते ६.४५ वाजता फार्म हाऊस, सावरखेडा, हिंगोली येथे घेण्यात येणार आहे. सायंकाळी ७.१५ वाजता औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाला ते जाणार आहेत. अश्या प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड – हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण दौरा हा असणार आहे.

मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना त्यांनी नुकसानीची पाहणी करावी अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाहणीचा साधा उल्लेख सुद्धा केलेला दिसत नाही. जरी दौऱ्यात उल्लेख नसला तरी मुख्यमंत्री शिंदे हे नुकसानीची पाहणी करतील आणि आढावा घेतील तसेच शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात काही घोषणा करतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा :- 

नक्की शिवसेना कोणाची ?, आजपासून दुसरा अंक रंगणार

Latest Posts

Don't Miss