spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चार्टर प्लेन वेळेवर पोहचायला घेता की उशीर जायला घेता, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

चार दिवसांचा खर्च तब्बल ३५ ते ४० कोटी एवढा होता. कर्मशियल विमानाऐवजी ते चार्टर विमानाने गेले.

अलीकडेच एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर गेले होते आणि आता त्याच्या याच दौऱ्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. मुंबईतील मातोश्री बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना आदित्य ठाकरेंनी, चार दिवसांचा खर्च तब्बल ३५ ते ४० कोटी एवढा होता. कर्मशियल विमानाऐवजी ते चार्टर विमानाने गेले. गेले तर गेले पण सकाळी पोहचण्याऐवजी सायंकाळी पोहचले व त्यामुळे महाराष्ट्रासाठीच्या बैठका रद्द केल्या, असे आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केले आहेत.

दावोसचा मुख्यमंत्र्यांचा दौरा हा चार दिवसांचा होता. त्याचा अभ्यास केला तर हीच गोष्ट समोर येते. कारण १६ ते २० असा हा दौऱ्याचा कार्यक्रम ठरला होता. ज्याचा खर्च वाढण्याची शक्यता होती आणि तो खर्च फार तर फार ३५ ते ४० कोटींच्या घरात असला असता. अजून पुढे खर्च मोजायचा झाला तर त्यांचा मित्रपरिवार त्यांनी वापरलेल्या गाड्यापण इतक्या खोलात मला जायचं नाही. पण चार दिवसांसाठी प्रत्येक दिवसाचा खर्च मोजला तर तो साडे सात ते १० कोटी खर्च केलेला आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दावोसला जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चार्टर विमानाचा वापर केला. याचा खर्च दोन ते अडीच कोटींचा खर्च झाला. तो देखील राज्यावरच आलेला आहे. आक्षेप चार्टर विमानाला नाहीये, पण जेव्हा तुम्ही चार्टर प्लेन वेळेवर पोहचायला घेता की उशीर जायला घेता असा सवाल त्यांनी केला. चार्टर विमानाने जावूनही दावोसला उशीरी पोहचल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.पण ४० कोटींचा खर्च, वेळेवर पोहचण्यासाठी चार्टर विमान असून देखील संध्याकाळी जेव्हा डावोसमधेय पोहचल्यानंतर एक-दोन बैठका झाल्या असतील पण अधिच्या बैठका रद्द झाल्या. कोणी कुठेही त्यांच्या बैठकीचं शेड्यूल कुठंच दिसलं नाही असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

प्रित्झकर आर्किटेक्चर पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय बाळकृष्ण दोशी यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

गोपीचंद पाडळकरांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss