संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये वाढले मतभेद

सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. रोज काही ना काही नवीन घडामोडी आणि चर्चाना उधाण आलेले असते. तयामुळे राज्याच्या राजकारणात सध्या संसनी खबर जास्त बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. आणि त्यामुळे जर अजित पवार भाजप बरोबर गेले तर राज्यात नवी सत्ता स्थापन करणार का ? या चर्चेला उधाण आलं होतं.

संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये वाढले मतभेद

सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. रोज काही ना काही नवीन घडामोडी आणि चर्चाना उधाण आलेले असते. तयामुळे राज्याच्या राजकारणात सध्या संसनी खबर जास्त बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. आणि त्यामुळे जर अजित पवार भाजप बरोबर गेले तर राज्यात नवी सत्ता स्थापन करणार का ? या चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान, अजित पवार यांनी एकंदर या मुद्यावर वाच्यता केली नव्हती पण जेव्हा पाणी डोक्यावरून जात असा म्हणतो ना अगदी तसाच काहीस अजित पवार यांच्या या विषयावरून पाणी डोक्यावरून जात असल्याचे वाटू लागल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्वा चर्चांना फटकारले तसेच यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांचाही समाचार घेतला. दरम्यान आता राऊतांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. त्यांमुळे आता राज्यात अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामधील मतभेद वाढले आहे की,काय अशा चर्चाना सुरवात झाली आहे. परंतु क्षणाचाही विलंब ना लावता अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवारांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता हल्ला चढवला.

अजित पवार यांनी नाव न घेता संजय राऊतांवर हल्ला चढवला आणि त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी मी फक्त शरद पवारांच ऐकतो असं म्हणत पवारांच्या वक्तव्याला फटकारले. तसेच मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. सत्य बोलतो. असही राऊत म्हणाले.त्याचबरोबर राष्ट्रवादी फुटीच्या चर्चेला मी जबाबदार नाही. शरद पवारांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांच ऐकतो. अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर पडली. मी मविआचा चौकीदार आहे. सेनाफुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आम्ही उघडा केला. वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता? शिवसेना फुटली तेव्हा तुम्हीदेखील वकिली करत होता. ते आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की, आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत रहावा आणि त्याचे लचके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल.तर त्यासाठी आमच्यावर कोणी खापर फोडणार असले तर ठीक आहे.तसेच प्रसार माध्यमांकडून अजित पवारांनी तुम्हाला टार्गेट केलं यासंदर्भात विचारलं असता, मला कोणी टार्गेट केलं तर मी मागे जाणारा माणून नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी नेहमी सत्य बोलतो.

तसेच अजित पवार यांनी थेट प्रसारमाध्यमांशी त्यांचा मुद्दा मांडला की , आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. याबद्दल मला खात्री आहेच पण लगेच त्यांनी मी स्वतःच्या माझ्या पक्षाबद्दल म्हणत नाही असे भाष्य केले. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. परंतु पक्षाबाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय.त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊतांबद्दल संताप व्यक्त केला.त्यामुळे आता संजय राऊत आणि अजित पवार यांच्या वैचारिक खटके उडत आहे हे तर नक्की झाले आहे ?

हे ही वाचा : 

नितेश राणे आणि संग्राम जगताप आमने-सामने

मध्य रेल्वेने भंगारातून कमावले तब्बल ४८३.२९ कोटी रुपये

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित माथेरान लाईट रेल्वेवरील हेरिटेज वॉक आणि पुस्तिकेचे प्रकाशन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version