दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर, विरोधकांच्या घोषणांनी आजही विधानभवन परिसर दणाणला

आज महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. आज देखील सभागृहात विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी केलेल्या आरोपांना काल दि. २७ डिसेंबर रोजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) उत्तर देणार होते.

दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर, विरोधकांच्या घोषणांनी आजही विधानभवन परिसर दणाणला

Maharashtra Assembly Winter Session 2022 : आज महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. आज देखील सभागृहात विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी केलेल्या आरोपांना काल दि. २७ डिसेंबर रोजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) उत्तर देणार होते. मात्र, सभागृहात ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळं आज तरी सत्तार मौन सोडणार का? आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडण करणार का? हे पाहणं महत्वाचं ठारणार आहे. मात्र, सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांना आक्रमक पवित्रा घेतला आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांचा आक्रमक सूर कायम आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीचे निदर्शने विधान भवन पायऱ्यांवर यावेळी नागपूर ची संत्री भ्रष्ट्र व चोर आहे मंत्री हा नारा दिला गेला तेही संत्रे हातात घेऊन सोबत दिल मांगे मोर सत्तार आहे चोर हा नारही होताच. नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… गद्दार सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा…संत्र्याला भाव, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… आटली बाटली फुटली, भूखंड खाताना लाज नाही वाटली… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आजही लावून धरल्याचे पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे (Opposition leaders Ajit Pawar and Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), रोहित पवार (Rohit Pawar), सुनील केदार, विकास ठाकरे, किरण लहामटे, भास्कर जाधव आदि उपस्थित होते.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Session मुंबईला केंद्रशासित करण्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस भडकले म्हणाले, मुंबई कोणाच्या बापाची…

विधानसभेत लक्षवेधीद्वारे अजित पवारांनी केली मागणी, शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक थांबवा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version