मानसपुत्र समजले जाणारे Dilip Walse-Patil यांनी शरद पवारांवर बोलणं टाळलं, म्हणाले…

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे आज पुण्यातील खेड तालुक्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला.

मानसपुत्र समजले जाणारे Dilip Walse-Patil यांनी शरद पवारांवर बोलणं टाळलं, म्हणाले…

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे आज पुण्यातील खेड तालुक्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा दिलीप वळसे म्हणाले ‘ पवार साहेबांचं वक्तव्य व्यवस्थित ऐका, ते जे बोलले त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. एवढंच बोलून वळसे पाटील थांबले आणि त्यांनी त्यासंदर्भात अधिकचं बोलणं टाळलं. तसेच, पुढे बोलताना तहसीलदार हे पद कंत्राटी पद्धतीनं भरणं योग्य नाही, पण अनेक विभागांमध्ये काहीकाळासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती होते, तिथं तातडीनं गरज असते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ते गरजेचं असतं, असं म्हणत वळसेंनी एका अर्थाने सरकारची पाठराखणचं केली.

शरद पवार यांनी भाजप सोबत गेलेल्या काही नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले ‘ जे लोक भाजपसोबत गेले ते लोक राष्ट्रवादीचे असूच शकत नाही. कोणी भाजपबरोबर जायची भमिका घेऊन तडजोड करण्याचा विचार करत असेल, तर तो विचार आम्ही स्विकारणार नाही. त्यासोबतच मतदानपेटीतून मी आणि राष्ट्रवादी कोणाच्या मनात आहे, हे नक्कीच कळेल ‘ असे ते म्हणाले आहेत. तसेच मतदानाच्या वेळी सगळं स्पष्ट होईल. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे त्यांना जनताच धडा शिकवेल. असे व्यक्तव शरद पवार यांनी पुण्यात केले होते.

पुण्यातील जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव या दोन तालुक्यांच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्या ताब्यात असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली होती. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती ही दिलीप वळसे पाटील त्यांच्यकडे असली तरीसुद्धा या बाजार पेठेत वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम हे आहेत. देवदत्त निकम हे वळसे पाटील याचा विरोध असून सुद्धा निवडून आले होते. दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता त्यामुळेच व्यक्त केली जात आहे. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते.

Exit mobile version