दिपाली सय्यद – राजसाहेब ठाकरे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणूकी नंतर…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या संबंधी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे. 

दिपाली सय्यद – राजसाहेब ठाकरे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणूकी नंतर…

अभिनेत्री दिपाली सय्यद या नेहमीच राजकारणा संबंधित अनेक ट्विट करत असतात. त्यामुळे त्या अनेकदा चर्चेत देखील राहतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या संबंधी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे.

काय म्हणाल्या दिपाली सय्यद ?
दिपाली सय्यद यांनी ट्विट मध्ये लिहिलं, “माननीय राजसाहेब ठाकरे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणूकी नंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजूनही अर्धवट आहे.”

राज ठाकरेंवर १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार होती पण त्यांच्या शरीरात कोरोना डेड सेलमुळे त्यांना अॅनेस्थेशिया देता आला नाही. लीलावती रूग्णालयातल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. २० जूनला म्हणजेच आज काही वेळापूर्वी ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. दीपाली सय्यद यांनीही राज ठाकरेंना लवकर बरं व्हा म्हटलं आहे पण फडणवीसांना टोला लगावला आहे.

दिपाली यांनी या आधीही राज ठाकरे यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं होतं. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्ध झाला त्यांनतर त्यांच्या रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर ही त्यांनी भाष्य केलं होतं. आम्हीं म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषित हिंदु जननायक मग अयोध्येला जायची गरज काय आहे. आजपासून तुम्हीं स्वयंघोषित हिंदूजनायक असं दिपाली यांनी ने ट्विट केलं होतं.

राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं फार वाढलं असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रिया होण्याआधी राज ठाकरे यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडं घातलं. मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना केली. पिंपरी चिंचवड मनसेचे सचिन चिखले यांच्यासह अनेक कार्यकर्ते तिथे उपस्थित होते.

Exit mobile version