विश्वासात न घेता थेट घोषणा केली, आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

युतीमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (President of Republican Party of India and Union Minister of State Ramdas Athawale) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत. तशी नाराजीचा त्यांनी आज व्यक्त केली आहे.

विश्वासात न घेता थेट घोषणा केली, आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर (After the transfer of power in Maharashtra) स्थापन झालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे (Prof. Jogendra Kawade) यांच्या रिपब्लिकन पार्टी (Republican Party) ची युती (Alliance) झाल्याचं पत्रक जोगेंद्र कवाडे यांनी काढले होते. त्यानंतर जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. या युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होत. मात्र या युतीमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (President of Republican Party of India and Union Minister of State Ramdas Athawale) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत. तशी नाराजीचा त्यांनी आज व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे यांची युती ही बहुजनांची मते मिळवण्यासाठी शिंदे गटाने केलेला प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. मात्र या युतीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे नाराज (displeased) असून त्यांनी ही नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (Chief Minister and Deputy Chief Minister) यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. कवाडे यांना युतीत घेतल्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला विश्वासात न घेता कवाडे यांना विश्वासात घेतले असे आठवले यांनी म्हटलं. याबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितलं.

ही नाराजी व्यक्त करताना रामदास आठवले म्हणाले,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणे अत्यंत आवश्यक होते. महायुतीत कुणाला घ्यायचे?, कोणत्या पक्षाला घ्यायचे? हा महायुतीचा निर्यण असतो. नवीन येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे, पण आपल्याला विचारामध्ये न घेता थेट घोषणा करण्यात आली हे योग्य नाही”,असं आठवले यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

नाराजी नाट्यानंतर वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला

सकारात्मक कार्यक्रमाला आले तर सकारात्मकच बोलणार, प्रीतम मुंडेंनी राजकीय भाष्य टाळलं

कलर्स मराठी नव्या मालिकांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला, नवीन वर्षात होणार धमाल मनोरंजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version