spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आपल्याला सत्तेत यायचंय, राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार, उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

एकीकडं भाजप (BJP) आणि शिंदे गटाची मनसेसोबत (MNS) जवळीक वाढताना दिसत आहे, त्यामुळं या तिन्ही पक्षांची महायुती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची शिवसेना यांची आघाडी होण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आधीच युतीचा प्रस्ताव दिलाय, त्यामुळं ही युती होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, काल कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

 हेही वाचा : 

Watch Video मुंबईत कोरियन युट्यूबर तरुणीची लाईव्ह व्हिडीओदरम्यान छेडछाड,आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही सांगितलं की मला पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे. पण मला मुख्यमंत्री करण्याची गरज नाही. पण माझ्या हक्काचा शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा आहे. हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता सत्यात उरवायचं असेल तर तुम्हाला सोबत येऊन वाड्या वस्त्यांमध्ये ही विचारांची मशाल घेऊन जावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी महिलेला मुख्यमंत्रिपदावर बसविण्याचा निर्धार केल्यानंतर शिवसेनेतली कोणती महिला मुख्यमंत्रिपदी बसणार? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण आतापर्यंत शिवसेनेकडून महिला नेत्याला मंत्रिपदाच्या संधीसाठीही झगडावं लागलं. त्यात उध्धव ठाकरेंनी महिलेला मुख्यमंत्रिपदी बसविण्याची आकांक्षा बोलून दाखवल्याने ठाकरेंच्या मनातली ‘ती’ महिला मुख्यमंत्री कोण? या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Gujarat Election 2022 पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान सुरू , तब्बल ७८८ उमेदवारांचं भवितव्य जनतेच्या हाती

शिवशक्ती-भीमशक्ती सोबत

या युतीची चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठी घोषणा केलीय. शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत. या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती व लहूशक्तीचा लवकरच मेळावा घेणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

दुचाकी चालकांनो सावधान! आजपासून ‘या’ शहरात हेल्मेटसक्ती, नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई

Latest Posts

Don't Miss