कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या ‘या’ वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा

कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या ‘या’ वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा

महाराष्ट्रात तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने आता राजकीय वादंग निर्माण झालेला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आत्ताचं सरकार मागच्या सरकारला जबाबदार धरतंय, मागच्या सरकारने आत्ताच्या सरकारवर ताशेरे ओढले आहे. पण या सगळ्यात आता न्यायालयीन कोठीत असलेल्या संजय राऊतांची चर्चा सुरू आहे.

आता सावंवाडी ते कणकवली धावणार ट्रेन? नारायण राणेंनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊतांनी या वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावर सध्यातरी कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र तरीही सध्या सोशल मीडियावर त्यांच्याच एका विधानाची चर्चा आहे. पोलिसांनी जेव्हा राऊतांना अटक केली आणि पोलीस त्यांना घेऊन जात होते. तेव्हा जाताजाता संजय राऊतांनी एक विधान केलं होतं की, “पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमकुवत होतोय.” याच विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

रणवीरने न्यूड फोटोशूट प्रकरणात दिले हे स्पष्टीकरण

 

“पेढा वाटा, महाराष्ट्र कमकुवत होतोय, पेढे वाटा. महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा. आनंद व्यक्त करणारे बंडखोर आमदार लोक त्यांना लाज वाटली पाहिजे.” अशी संपत प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

शिवसेनेच्या अनेक समर्थकांनी तसंच अनेक सोशल मीडियावर संजय राऊतांचा तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. काही जणांनी ट्वीट करत संजय राऊतांचं हे विधान शेअर केलं आहे. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनीही याविषयी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय. कारण आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहे. अशावेळी सकाळी संध्याकाळी तुमचा कडक आवाजातला होणारा विरोध खूप महत्त्वाचा आहे, असं ट्वीट कुचिक यांनी केलं आहे. तर महाराष्ट्र कमजोर होतोय हे संजय राऊतांचं विधान आता खरं ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिलं आहे.

हेही वाचा : 

राशी भविष्य १६ सप्टेंबर २०२२, मीन राशीच्या लोकांना आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो

Exit mobile version