spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बंडखोर आमदारांची संख्या 40 वर, काय असेल शिवसेनेची भुमिका ?

शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर आज शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

मुंबई : शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर आज शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) उपस्थित होते. शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर पक्षाच्या पुढील रणनितीवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी विधानसभेतील शिवसेनेसोबत असलेले विधानसभेचे 15 आमदारही शिवसेना भवनात दाखल झाल्याची माहिती समोत येत आहे.

या बंडाच्या परिणामी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त झाले असून बंडखोर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली आहे. येत्या काळात राज्यात मुंबई, ठाणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आमदारांच्या बंडखोरीचा फटका या निवडणुकांमध्ये ( Uddhav Thackeray) बसू नये यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत.

पक्ष टिकवण्यासाठी आणि या आगामी निवडणुकांच्या अनुषगांने आता शिवसेनेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आज शिवसेना भवनमध्ये ( Uddhav Thackeray)  झालेल्या बैठकीत जिल्हाप्रमुखांकडून संघटनात्मक आढावा घेतला.

या बैठकी दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्य़ा भाषनात काही मुद्दे मांडले 

लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. आणि जर तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे. असे उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray) आपली भूमिका मांडली.

हेही वाचा : 

शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांची आदित्य ठाकरे यांच्या सोबत चर्चा

Latest Posts

Don't Miss