Diwali 2022 : राज ठाकरेसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील मनसेच्या दीपोत्सवासाठी येणार एकत्र

आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं.

Diwali 2022 : राज ठाकरेसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील मनसेच्या दीपोत्सवासाठी येणार एकत्र

आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. मनसेच्या (MNS) वतीनं आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राज्यातील दिग्गज नेते एकत्र येणार आहेत.

दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दिवाळीच्या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मनसेच्या वतीनं शिवाजी पार्कवर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याचा शुभारंभ आज दि. २१ ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे उपस्थित असतात. यंदा मात्र, दिग्गज नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेच्या दीपोत्सवात यंदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार आहेत.

राज ठाकरेंच्या मनसेच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्यानं राजकीय वर्तुळाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाला मुंबईतील सर्व विभाग अध्यक्ष तसेच शाखा अध्यक्ष, महिला-पुरुष पदाधिकारी यांनी या दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

मनसेच्या वतीने दीपोत्सवाची जंगी तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्कमध्ये भले मोठे कंदील लावण्यात आले आहेत. झुंबर आणि इतर लायटिंगदेखील लक्षवेधी ठरतेय. शिंदे आणि फडणवीस यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी चार वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध चांगले आहेत, हे सर्वश्रुत आहे. त्यातच दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी आमंत्रित केलं होतं. आता राज ठाकरे यांनाही शिंदे-भाजप महायुतीत एकत्र घेतलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

राजकारणात सर्व काही शक्य असतं, असं म्हटलं जातं. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे भाजपसोबत जाण्याची एक महत्त्वाची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची मतं फोडण्यात भाजपा यशस्वी होऊ शकेल.

हे ही वाचा:

रेल्वेत टीसीची नोकरी देतो सांगून तीन लाख रुपयांचा गंडा

लोकसभा निवडणुकीसाठी मनसे ॲक्टिव, आता बारामती मतदार संघासाठी कंबर कसली

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळी भेट; राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version