spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन; राज ठाकरेंनी केलं पत्राद्वारे मुंबईकरांना आवाहन

आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं.

आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. मनसेच्या (MNS) वतीनं आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राज्यातील दिग्गज नेते एकत्र तर येणार आहेतच पण त्याचसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रामार्फत सर्व मुंबईकरांना देखील एकत्र येण्याचं आवाहन केले आहे.

हे ही वाचा :  Diwali 2022 : राज ठाकरेसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील मनसेच्या दीपोत्सवासाठी येणार एकत्र

दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दिवाळीच्या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मनसेच्या वतीनं शिवाजी पार्कवर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याचा शुभारंभ आज होणार आहे. वसुबारसेपासून, २१ ऑक्टोबर २०२२ पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, ८ नोव्हेबंर २०२२ पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे उपस्थित असतात. यंदा मात्र, दिग्गज नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेच्या दीपोत्सवात यंदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रा मार्फत सर्व मुंबईकरांना देखील एकत्र येण्याचं आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांचं पत्र –

२१ ऑक्टोबर, २०२२

*माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो
तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो*,

दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष करोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय.

दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या १० वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या २ वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.

दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.

वसुबारसेपासून, २१ ऑक्टोबर २०२२ पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, ८ नोव्हेबंर २०२२ पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे.
यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा.

आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.

आपल्या सर्वांचा,
राज ठाकरे

हे ही वाचा:

कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता; WHO मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधल्या बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी दाखल

Shivraj Patil : शिवराज पाटलांच्या वक्तव्यावरुन भाजपने केली जहरी टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss