आदित्यविषयी मला प्रश्न विचारू नका, अन्यथा मी निघतो; नारायण राणे

आदित्यविषयी मला प्रश्न विचारू नका, अन्यथा मी निघतो; नारायण राणे

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे. त्यामुळे आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे मैदानात उतरले असून राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना दिसून येत आहेत. तसेच दिवगंत रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी त्यांच्यासोबत भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. दिवगंत रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत नारायण राणे यांची जाहीर सभा होणार असल्याचे यावेळी आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. सर्व पक्ष एकत्र आले म्हणजे शक्ती तयार होत नाही. त्यांच्यात एकमत कुठय, असा सवाल राणे यांनी केला. भाजपची देशात, महाराष्ट्रात आणि सर्वाधिक राज्यात सत्ता आहे, असं म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंना भाषा सुधारण्याचा सल्ला दिला. ते म्हणायचे सरकार पाडून दाखवा. आम्ही सरकार पाडून दाखवलं. आता आम्ही मैदानात आहोत. त्यामुळे आतातरी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री सोडा, असं आव्हानही राणे यांनी दिलं.

यावेळी राणे यांना आदित्य ठाकरे यांचा प्रश्न विचारला. त्यावर राणे संतापलेले पाहायला मिळाले. आदित्यविषयी मला प्रश्न विचारू नका, अन्यथा मी निघतो, असंही राणे म्हणाले. ठाकरेंकडे काहीही राहिलं नाही. राज्य गेलं, मुंबई गेली, आता वरळी आली का? नंतर मातोश्री वाचविण्याची वेळ येईल, असा टोलाही राणेंनी लगावला. तसेच रमेश लटके हयात असते तर ते शिंदे गटात आले असते, असा दावाही त्यांनी केला.बनावट शपथपत्राची चौकशी सुरु आहे. दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. लवकरच वास्तव समोर येईल, असे नारायण राणे म्हणाले. सकाळी बाबुलनाथचं दर्शन घेऊन मी प्रचाराला सुरवात केली आहे. मी एकाच सांगतो दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई माझ्याकडे आहे. मी तिकडेही जाऊन आलो आणि इकडे मुंबईतही प्रचार सुरु आहे. मी दोन्ही मतदार संघ निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. मुंबईमधील अंधोरीच्या पोट निवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला आहे. त्यांचा विजय नक्की होईल. आम्ही नक्कीच जिंकूया, असा विश्वासही यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा :Sourav Ganguli: सौरव गांगुलींची बंधन बँकेने केली ब्रँड ॲम्बेसेडर पदी नियुक्ती

T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या जागी ‘या’ गोलंदाजाचा टीममध्ये समावेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version