त्यांची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची? – Sanjay Raut

त्यांची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची? – Sanjay Raut

आमचा पक्ष फोडून झाला, आता कारवाई करता करा आम्ही तयार आहे, याला उत्तर नक्की देणार असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला. मुलुंडचा नागडा पोपटलाल काय बोलतोय, त्याच्या विरोधात पाच महिला आमच्याकडे तक्रार करायला आल्या आहेत. ईडीचं काम २ ते ५ लाखाची चौकशी करणं, एवढी ईडीची पातळी घसरली आहे. विक्रांत बचावबद्दल मी विचारलं, कोर्टात जावं म्हणतोय, या सोमय्याने कोर्ट मॅनेज केलं आहे, ईडीला हे दिसत नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

किरीट सोमय्याची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची? आम्ही डरपोक नाही. किती काळ आम्हाला त्रास द्याल? आमच्यापुढे राज्याच्या लढवय्या बाण्याचा आदर्श आहे. आम्ही तुमच्यासारखे रणछोडदास नाहीत. आम्ही लढू आणि जिंकू असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. पाच महिला सोमय्यांच्या विरोधात तक्रार द्यायला तयार आहेत, हा आमच्यावर आरोप करतोय. महाराष्ट्रातून उद्योग पळवून घेऊन जात आहेत. त्यावर बोलावं याने. खिचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे लाभार्थी भाजपात आणि मिंधे गटात आहेत. आम्ही जनतेच्या न्यायालयात त्यांना घेऊन जाणार, खिचडी घोटाळा म्हणता ज्यांनी काम केली, त्याची कंत्राटं आता देवगिरी आणि वर्षा बंगल्यावर आहेत, असा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.

सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली त्यांच्या पार्टनरवर का कारवाई करत नाही? मुलुंडच्या पोपटलालची ही नावं घेण्याची हिंमत आहे का? आता ही केटरिंग सुरु आहेत, त्यातील १६ ते २० कोटींची बिल खोटी काढली आहेत. जागा वाटपासंदर्भात ११ वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे. आमच्यात कोणताही वाद नाही, वंचित आघाडीसुद्धा  आज उपस्थित राहणार आहे. त्यांची आणि आमची लढाई एकच आहे, कोणताही वाद नाही. राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version