Aditya Thakare यांच्या वाढदिवसानिमीत्तकेलेल्या जीवनदानाबद्दल तुम्हला माहित आहे का? …

२ लाख उपचार खर्च हा आरझू च्या वडिलांना परवडत नसल्याने त्यांनी मित्र आणि ओळखीच्या लोकांना मदतीसाठी हताश विनवणी पाठवली जी सोशल मीडियावर देखील वाऱ्याच्या वेगाने पसरली

Aditya Thakare यांच्या वाढदिवसानिमीत्तकेलेल्या जीवनदानाबद्दल तुम्हला माहित आहे का? …

महाराष्ट्राच्या राजकारणातले प्रसिद्ध युवानेते म्हणजे आदित्य ठाकरे (Aditya Thakare). आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्याचे म्हणजेच उद्धव ठाकरे (Udhav Thakare) यांचे चिरंजीव आहेत. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील अनेक तरुणाईसाठी यूथ आयकॉन आहेत. आदित्य ठाकरेंना राजकारणा शिवाय सिंगिंग आणि कविता करण्यात सुद्धा त्यांचा रस आहे. राजकारणातील या युवा नेत्याचा आज १३ जून रोजी वाढदिवस आहे. प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी आदित्य ठाकरे हे काही तरी चांगले किंवा पुण्याचे काम करतात. असेच एक पुण्याचे काम त्यांनी आपल्या तिसाव्या वाढदिवसाच्या दिवशी केले.

महाराष्ट्राचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या तिसाव्या वाढदिवसा निमित्त मोठे पुण्याचे काम केले. आदित्य ठाकरे यांनी १३ जून २०२० साली हृदयविकाराच्या मोठ्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या ६ दिवसांच्या अर्भकाचे प्राण वाचवण्यास मदत केली. नवी मुंबईतील अब्दुल अन्सारी नावाचा एक माणूस, चित्रकार म्हणून काम करत होता, त्याच्या नवजात मुलाला तीन ब्लॉकेज आणि हृदयात छिद्र आढळून आल्यानंतर, त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. आरझू या बालकाचा जन्म ऐरोली येथील नागरी रुग्णालयात झाला आणि नंतर डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी तातडीच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर त्याला नेरुळच्या मंगल प्रभू रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तरी देखील आरझूच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती शिवाय आणखीनच बिघडत होती. आरझू ने उपचारांना साथ न दिल्यामुळे तिच्या जिवाला धोका निर्माण झाला यामुळे डॉक्टरांनी तब्बल २ लाखांपेक्षा जास्त उपचार खर्च सांगितला.

२ लाख उपचार खर्च हा आरझू च्या वडिलांना परवडत नसल्याने त्यांनी मित्र आणि ओळखीच्या लोकांना मदतीसाठी हताश विनवणी पाठवली जी सोशल मीडियावर देखील वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि शेवटी युवासेना कार्यकर्ते राहुल कनाल आणि हुसेन शाह यांच्यापर्यंत पोहोचली. राहुल कनाल आणि हुसेन शाह यांनी ही माहिती आदित्य ठाकरे यांना दिली.आदित्य ठाकरे यांनी बाळाचे प्राण वाचवण्यासाठी मदत करण्यास तत्काळ सहमती दर्शविली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र यांनी अन्सारी यांना तातडीने १००,००० रुपयांचे योगदान पाठवले आणि आरझूच्या भविष्यातील वैद्यकीय खर्चाची काळजी घेण्याचे आश्वासनही दिले.

हे ही वाचा:

राज्यामधील गद्दार सरकारची लवकरच अनिव्हर्सरी, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

राज्यामधील गद्दार सरकारची लवकरच अनिव्हर्सरी, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version