‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?” आशिष शेलारांचा खोचक टोला

राज्यात शिवसेनेमधून एकनाथ शिंदे बंड करून बाहेर पडले. आणि राज्यात भाजप सोबत सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर एकमेकांवर वारंवार टीका केल्याचं जात होत्या.

‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?” आशिष शेलारांचा खोचक टोला

राज्यात शिवसेनेमधून एकनाथ शिंदे बंड करून बाहेर पडले. आणि राज्यात भाजप सोबत सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर एकमेकांवर वारंवार टीका केल्याचं जात होत्या. शिवसेना आणि भाजप या दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर सतत टीका आणि टोलेबाजी होत असल्याचे पाहायला मिळालं आहे.

शिवसेना आणि भाजपा हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याप्रमाणे हा टोलेबाजीचा सामना त्यांच्यात सातत्याने सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यात एकीकडे भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. त्यात आता भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एक खुलं पत्र लिहून खोचक शब्दांत टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भात ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक खुलं पत्र शेअर केलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी भाजपाचा शिवसेनेकडून कमळाबाई अशा शब्दांत उल्लेख करण्याचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न करता फक्त “संपादक, सामना” असाच उल्लेख आशिष शेलार यांनी केल्यामुळे त्यावरून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे ‘शिवसेना आमचीच’, असा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना दुसरीकडे भाजपाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न केल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

“प्रति, श्री उद्धवजी ठाकरे, संपादक, सामना… महोदय,. आपण आमच्या कमळाला हिणवायला ‘बाई’ म्हणताय? हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?” असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. शिवाय पुढे “असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडेपण आहेत!” असा टोलाही लगावला आहे.

 

हे ही वाचा :

केदार शिंदेंची कन्या झळकणार ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटांमध्ये, महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version