spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दारू पाहिजे का.. हे सहज बोलायला तुम्ही सामान्य नाहीत, मंत्री आहात!! अजितदादांकडून सत्तारांचा समाचार..

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत खा. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ झाल्याच्या प्रकरणावरून मंत्री अब्दुल सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत खा. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ झाल्याच्या प्रकरणावरून मंत्री अब्दुल सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वाचाळवीरांना आवरावं असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. तसंच सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलीस तणावाखाली असून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोपही अजित पवारा यांनी केला आहे.

मंत्री काहीही वक्तव्य करतात.. चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, दूध पाहिजे का असं सामान्य लोक विचारतात. पण त्यानंतरही दारू पाहिजे का… असं विचारण्यापर्यंत मजल गेली आहे. नंतर मी हे सहज म्हणालो, असंही बोलतात. हे सहज बोलायला तुम्ही समान्य नागरिक नाहीत. मंत्री आहात. जबाबदार आहात, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तार यांची कानउघडणी केली. मंत्रि पदावर असताना घटना, नियम यांचा आदर करायचा असतो. अंबरनाथमध्ये दिवसा-ढवळ्या बैलगाडा शर्यतीवरून गोळीबार घडला. सरकार काय करतंय? ठाणे जिल्ह्यात किसन नगरमध्ये दोन गटात राडा झाला, पोलीस यंत्रणा राजकीय वाद सोडवण्यात बिझी झाली तर उर्वरीत कामं कोण करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला.

ते म्हणाले, देशात चांगलं प्रशासन म्हणून ओळख आहे. सरकार आल्यापासून पोलीस विभाग तणावाखाली काम करतोय. काल मी जितेंद्र आव्हाड यांना भेटायला गेलो. शहराध्यक्ष आनंद परांजपेंना भेटलो. अनेकांनी मला सांगितलं, पोलीस ऐकत नाहीत. पोलीस सांगतात, आमच्यावर प्रेशर आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही, असं अजित पवार म्हणाले. मंत्रालयातील सचिव दर्जाचे, इतर कर्मचारी तणावात काम करतात. त्यांना सीएम ऑफिसमधून थेट आदेश येतात. सरकार चालवत असताना आदेश आल्यानंतर बजेट, अर्थसंकल्प, पुरवणी मागण्या अशी प्रक्रिया असते… पण वरिष्ठांनी आदेश केलेलं काम ताबडतोब झालं पाहिजे, अशा सूचना असतात. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीही तणावाखाली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय.

सरकारमधील वाचाळवीरांना आवरा, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला. “मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचं चुकत असेल तर त्यांना सांगायला हवं. सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलं आहे. काहीही बोलतात. प्रवक्त्यांनी काय बोलावं यात मी बोलणार नाही. पण ज्याप्रकारे मंत्रिमंडळातील लोक बोलतायत यामुळे मंत्रिमंडळाची प्रतिमा सुद्धा खराब होईल. लोक ऐकतात, पाहतात आणि लक्षात ठेवत असतात. तुम्ही आता सहज बोलायला सर्वसामान्य नागरिक नाहीत. राज्याचे प्रतिनिधी आहात. मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलीय. तुच्यावर जबाबदारी आहे. अब्दुल सत्तार माझ्या बहिणीला बोलले. विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हटलं पाहिजे. संविधान, कायदा, घटना, नियम याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवारांनी मंत्री, आमदार तसंच नगरसेवकांना मिळणाऱ्या सुरक्षेवरही बोट ठेवलं. ते म्हणाले की, अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान दिवसाढवळ्या गोळीबार होतो तर सरकार काय करत होतं, पोलीस यंत्रणा काय करते? ठाण्यात शिंदे-ठाकरे गटात राडा झाला. असा राडा चालणार नाही. यामुळे पोलिसांना या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतलं. मी माहिती मागवली आहे की किती जणांना वाय प्लस दर्जा आहे. त्यांना खरंच गरज आहे का? सरकारमधील काही जणांच्या ताफ्यात तीस तीस गाड्या देण्यात आल्या आहेत. पण हा टॅक्सच्या रुपाने जमा झालेला सरकारचा पैसा आहे. सरसकट सगळ्यांना सुरक्षा देण्याची काय गरज? काही माजी नगरसेवकांना देखील सुरक्षा दिली आहे.

सत्ताधाऱ्यांमुळे पोलीस विभाग आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तणावाखाली काम करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तसंच मंत्रालयातील अधिकाऱ्यांन थेट सीएमओमधून आदेश येत असल्याचं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले की, “शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रशासनात म्हणावं तसं काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झालं आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर संपूर्ण राज्याचा लोड होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करुन १८ लोकांना मंत्रिमंडळात घेतलं. महाराष्ट्रातील पोलीस आणि प्रशासन देशातील सर्वोत्तम असल्याचं म्हटलं जातं. परंतु सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड दबावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरुन आदेश येतात आणि अन्याय होत असला तरी पोलीस बोलून दाखवतात की आमचा नाईलाज आहे, आमच्यावर प्रेशर आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. पोलीस विभाग आणि मंत्रलायतील सचिव दर्जाचे आणि इतर कर्मचारी तणावात काम करतात. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून थेट आदेश येतात. जनतेचा आजही पोलीस आणि प्रशासनावर विश्वास आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरु झालेली परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही.”

हे ही वाचा :

मारेकरी आफताब सायको किलर?, श्रद्धाची हत्या, दुसरीशी शरीरसंबंध, तर तिसरीला…

मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss