राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का? संजय राऊतांचा सवाल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का? संजय राऊतांचा सवाल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. २०१४- २०१९ या कार्य काळात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना अनेक वचन, आश्वासन दिले. त्यांना त्यांच्या मालाचा योग्य हमीभाव देऊ ही मोदी गॅरेंटी होती. शेतकऱ्यांना डबल उत्पादन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र १० वर्षांच्या कार्यकाळात यातील कोणतीच आश्वासन पूर्ण झाली नाहीत. या उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कॉन्ट्रॅक्ट फार्मरच्या माध्यमातून भाजपला देणग्या देणारे बड्या उद्योगपतींच्या कशात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यावेळेस शेतकरी न्याय मागण्यासाठी पुढे आले तेव्हा त्यांच्या अंगावर अश्रूदराच्या नळकांड्या आणि गोळ्या चालवण्यात आल्या ही मोदींची गॅरंटी आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

नरेश टिकेत जाऊन आंदोलन झाले. २०२० साली तेव्हा ७२० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले, आता उद्याच्या आंदोलनामध्ये तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रणगाडे चालवणार का? राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांना येऊ दिल जात नाही. राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का?असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. दिल्लीमध्ये ब्रिटिशांचाही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारात आपल्या मागण्या मांडत होते, पण मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता येणार नाहीत, देशाच्या राजधानीमध्ये जाता येत नाही, मुंबईत येता येत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, म्हणून आज सर्व मिळून आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी चर्चा करू. मोदी चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. यवतमाळ वाशिम मध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. मोदींनी केलेले पाच प्रकल्प दाखवले पाहिजे जे मोदींनी केले आहेत, मोदींनी दहा वर्षांमध्ये जी उद्घाटन केली ते प्रकल्प २०१४ च्या आधीचे आहेत, मोदी आणि त्यांचे सरकार नेहमीच खोटं बोलत आलं आहे, आता दोन-तीन महिने राहिले आहेत खोटे बोलण्याची जी नशा आहे ती करून घ्या, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, कृपाशंकर सिंग , पवन सिंग यांचे नाव यादीमध्ये येऊ शकते. मात्र महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादीमध्ये येणं हा त्यांचा अपमान आहे. हा महाराष्ट्राचासुद्धा अपमान आहे. ते खूप स्पष्ट व्यक्त आहेत. खूपच प्रामाणिक नेते आहेत आम्हा सर्वांना वाईट वाटलं की त्यांचं नाव नाही, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला होणार, काय आहे अंडरवॉटर मेट्रोची खासियत

मुलाच्या प्री वेडिंग सोहळ्यात नीता अंबानी यांनी केले पारंपारीक भारतीय नृत्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version