माझी तुलना गद्दारांशी करू नका – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्मण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत.

माझी तुलना गद्दारांशी करू नका – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्मण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर राज ठाकरेंनी आज पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी माझी तुलना गद्दारांशी करू नका असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडावर भाष्य करताना छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडासोबत माझ्या त्या निर्णयाशी तुलना करू नका असे राज ठाकरे यांनी सांगितले. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात सामिल झाले. मात्र, तसेच शिवसेना सोडण्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी काय म्हटले, याची आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले, ‘ बाळासाहेबांना समजलं होतं. त्यामुळे मी दगाफटका करून, पाठित खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. बाहेर पडून कोणत्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केलाय… तसेच पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा प्रसंग राज ठाकरे यांनी सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांना कळलं की मी आता शिवसेनेत राहणार नाही. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसोबतच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग सांगितला. शिवसेना सोडण्याआधी मला त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. मनोहर जोशी यांच्यासोबत त्यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. खोली गेल्यानंतर त्यांनी मला मिठी मारली आणि आता जा, असे म्हणाले. मी पक्ष सोडतोय हे त्यांना कळलं होतं. मी दगाफटका करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तुम्हा कार्यकर्त्यांच्या बळावर नवीन पक्ष स्थापन केला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज्यातल्या सत्तांतराच्या खेळामध्ये ते सक्रिय झाले आहेत. आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेच्या पुनर्बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. त्यांचे पुत्र अमित ठाकरेही (Amit Thackeray) विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत आहेत.

 

हे ही वाचा :-

आमदार रोहित पवार यांची राज्य सरकारवर खोचक टीका

आमदार सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version