spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राजकारण गढूळ करण्याचाही प्रयत्न करु नये, अजित पवारांचा विरोधकांना सल्ला

माझी भूमिका चुकीची ठरवणारे तुम्ही कोण?, असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे. आज अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक असल्याचं विधान केलं होते. त्यानंतर या विधानावरून अजित पवार यांना भाजपने धारेवर धरलं होत. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत, अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं, स्पष्ट केलं. मात्र तरी देखील त्यांची भूमिका चुकीचं असल्याचं विरोधकांचं मत आहे. त्यावर माझी भूमिका चुकीची ठरवणारे तुम्ही कोण?, असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे. आज अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले,”छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयीची माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे.मी माझ्याभूमीकरवर ठाम आहे. त्यामुळे आता हा विषय वाढवण्याची गरज नाही. मी कधीही महापुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपाला नाही. लोकांच्या अनेक समस्या आहेत, त्याकडे लक्ष द्यावं. राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानासाठी झाली आहे. आम्ही पुरोगामी विचार मानणारे लोक आहोत. काँग्रेसमध्ये असताना देखील सर्वधर्मसमभाव असाच विचार होता. त्यावेळी दुजाभाव केला नाही. वडिलधाऱ्यांनी आपल्यावर जे संस्कार केले आहेत. त्याला कुठेही धक्का न लागत आता पर्यंत कामं केलं आहेत. माझी भूमिका सगळ्यांना पटली पाहिजेच असा माझा आग्रह नाही,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

यापुढे ते म्हणाले,’आमच्या दहा पिढ्या छत्रपतींचा अपमान करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जिवंत असे पर्यंत आमच्याकडून होणार नाही आणि आमच्या दहा पिढ्याही त्यांचा अपमान होईल असं वक्तव्य करणार नाही. त्यामुळे विरोधकांनी या संदर्भात कोणतंही नवं राजकारण करू नये आणि राजकारण गढूळ करण्याचाही प्रयन्त ही करू नये,” असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होत. त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार पुण्यात आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्याचबरोबर संभाजी महाराज यांचा स्वराज्य रक्षक उल्लेख असणारे स्टिकर्स देखील वाटण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असणारे स्टिकर्स छापण्यात आले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या गाडीवर हे स्टिकर्स लावण्यात आले. अजित पवार यांनी एका गाडीला स्टिकर लावलं आणि बाकी कार्यकर्त्यांना स्टिकरचं वाटप केलं. हे स्टिकर्स पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील वाटण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते हे स्टिकर्स त्याच्या वाहनांवर, घरांवर आणि इतर ठिकाणी लावणार आहेत.त्याचबरोबर महापालिकेच्या इच्छुक उमेदवारांना देखील हे स्टिकर्स देण्यात येणार आहेत, जेणेकरून ते हे मतदारांपर्यंत पोहचवतील

हे ही वाचा:

Watch Video, रितेशच्या प्रश्नांच करीना कपूरने पहिल्यादांच दिल मराठीत उत्तर

दिल्लीच्या महापौर पदावरून मोठा वाद, आप-भाजप संघर्षानंतर सभागृह तहकूब

Journalist Day : ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून का साजरा केला जातो, घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss