spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नका; शिंदे गटाची कोर्टात धाव

शिवसेनेत बंड झाल्यानंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटात वाद दिसून येत आहे. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं. त्यांनतर दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाचा काही निर्णय येण्याअगोदरच शिंदे गटाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. आज शिंदे गटाने कॅव्हेट दाखल केलंय.

दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं. शिवाय ‘शिवसेना’ हे नावदेखील आता वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील निवडणूक आयोगाकडे दिलेली आहेत. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचा समावेश आहे. नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिल्याचं उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं.

याबरोबरच उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात अपिल केलं असून निवडणूक आयोगाच्या चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात दाद मागितली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी दिली नसून प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताय निर्णय दिला, असं म्हटलं आहे. ठाकरेंच्या या अपिलावर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय देण्याआधीच आता शिंदे गटाने कॅव्हेट दाखल केलं आहे. म्हणजे आता न्यायालयाला शिंदे गटाचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देता येणार नाही.

हे ही वाचा:

वाढती अंतराळ सेवा २०२५ पर्यंत भारताला १३ डॉलर अब्ज महसूल मिळवून देणार, इंडियन स्पेस असोसिएशनचा दावा

अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येईल – अनिल परब

Phone Bhoot Trailer : बहुप्रतीक्षित हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss