spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदेगटातील एका बंडखोर आमदाराला महिला शिवसेना आघाडीला सामोरे जावे लागले

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री शपथविधीनंतर बंडखोर आमदार हे आपल्या मूळ मतदार संघामध्ये परतले आहेत.

अंबरनाथ : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री शपथविधीनंतर बंडखोर आमदार हे आपल्या मूळ मतदार संघामध्ये परतले आहेत. त्याचप्रमाणे काही शिवसैनिकांचा विरोध आणि रोषाला या बंडखोर आमदारांना सामोरे जावे लागत आहे.
असाच काहीसा प्रकार अंबरनाथ मध्ये घडलेला दिसून आला. बंडखोर आमदारांपैकी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना महिला शिवसैनिकांसमोरून काढता पाय घ्यावा लागला.

आमदार किणीकर हे आज विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी अंबरनाथ पालिकेत आले होते. पालिकेच्या मुख्यअधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू होती मात्र याचवेळी आमदार किणीकर यांनी शिवसेना महिला आघाडीला न विचारता थेट मुख्यअधिकारी यांच्या केबिन गाठली त्यामुळे महिला शिवसैनिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

हेही वाचा:

‘तामिळनाडूमध्ये आणखी एक एकनाथ शिंदे उदयास येऊ शकतो’: भाजपच्या अण्णामलाई यांचा द्रमुकला इशारा

या बैठकीला सेनेच्या महिला अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले नाही? असा प्रश्नही महिला आघाडीच्या काही पद अधिकाऱ्यांनी केला. आम्हीशिवसैनिक नाही का? आम्हाला वेगळे का डावले जात आहे इथे बैठकाही वेगळ्या का घेतल्या जात आहेत? असे शिवसैनिक महिलांनी प्रश्न विचारला. यावेळी किणीकर यांना आपली बाजू मांडण्याची देखील महिलांनी संधी दिली नाही.

अंबरनाथमध्ये झालेल्या या सगळया प्रकरणानंतर येत्या काळात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या बंडखोर आमदार, त्यांचे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये अशाच प्रकारची वागणूक दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारपासून शिंदे गटातील अनेक आमदार आपल्या मतदारसंघात परतले आहेत. या बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडून त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. तर, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या जात आहेत.

‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Latest Posts

Don't Miss