spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कॉंग्रेसच्या खासदाराने द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधले, संसदेत भाजपकडून गदारोळ

कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत वादग्रस्त शब्द वापरला.

नवी दिल्ली : कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत वादग्रस्त शब्द वापरला. अधीर चौधरी यांनी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ शब्दाचा वापर संबोधले आहे. चौधरी यांच्या शब्दावर भाजपने तीव्र आक्षेप घेत ‘हे शब्द घृणास्पद तसेच सर्व मुल्ये आणि संस्कारांना काळीमा फासणारे असल्याचे’ म्हटले आहे. भारत देशाच्या घटनात्मक सर्वोच्च पदावर बसलेल्या अदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याने कॉंग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.

भर संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यावर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी एका प्रसार माध्यमावरील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी म्हणून संबोधित केले होते. तेव्हापासून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली.अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, “आपल्या तोंडून चुकून एक शब्द बाहेर पडला. ज्याचा आपल्या खूप खेद असून, भाजपकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते या प्रकरणाचा राईचा पर्वत करत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : 

सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का, नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच

भाजप नेत्यांची आक्रमक भूमिका

भाजप नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, “द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक निवडणूक जिंकल्यानंतर, एक आदिवासी, गरीब महिला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाला शोभते हे सत्य काँग्रेसला अजूनही मान्य नाही. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या व्यक्तीचा अनादर करणे. तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याचे काम करीत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी संसदेत आणि रस्त्यावर उतरून देशाच्या प्रथम नागरिकाची आणि देशाची माफी मागावी”,असे इराणी म्हणाल्या.

कोणतीही कारवाई करा, मी गुडघे टेकणार नाही ; संजय राऊत

Latest Posts

Don't Miss