Wednesday, September 25, 2024

Latest Posts

राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू आघाडीवर

देशाचे पंधरावे राष्ट्रपती कोण होणार? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आणि याचा निकाल आज कळणार आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान झाले होते. सदस्य भावनात आज सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. द्रौपदी मुर्मू एनडीए कडून तर यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार आहेत. मुर्मू यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे. जर त्या जिंकल्या तर देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनतील.

राष्ट्रपती निवडणुकीतील मतमोजणीच्या पहिला फेरीचे निकाल जाहीर झाले आहे.  द्रौपदी मुर्मू यांना आत्तापर्यंत 540 मते मिळाले आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार खात्यात 208 मते आली आहेत. खासदारांची मतमोजणी  पूर्ण झाली आहे. एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा अधिकची मत मुर्मू यांना मिळाली आहेत. त्यामुळे विरोधकांची मत फुटल्याचा सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येते.

देशाचे नवे राष्ट्रपती हे 25 जुलै रोजी शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. 18 जुलैच्या मतदान संसदेत 727 जणांनी मतदान केले त्यात 719 खासदार आणि नऊ आमदारांचा समावेश आहे. या मतदारांना संसद भावनात मतदान करण्याची परवानगी मिळाली होती. एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेल्या पाठिंबा लक्षात घेता निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय प्राप्त होईल असा राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

आरे कारशेड वरील बंदी मुख्यमंत्र्यांनी हटवली, आता मेट्रोचा मार्ग मोकळा

Latest Posts

Don't Miss