spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्ययामुळे, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा शिवप्रेमीचा मोर्चा थंडावला

राज्यातील गडकिल्ल्यांची फार दुरावस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी आज मुंबईमध्ये शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. आंदोलक सीएसएमटी येथून मंत्रालयाकडे रवाना झाले होते. मात्र, या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पहाटेपासून या आंदोलनासाठी राज्यभरातून शिवप्रेमी जमायला सुरुवात झाली होती. सुमारे पाचशे आंदोलक मंत्रायलयाच्या दिशेने कूच करत निघाले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं आहे.

हेही वाचा : 

Adipurush : प्रभास आणि क्रिती सॅनन पडले प्रेमात?,आदिपुरुषच्या सेटवर वाढली जवळीक

मंत्र्यांच्या बंगल्याला गडकिल्ल्यांचे नाव दिले आहेत पण संवर्धन जबाबदारीने का केले जात नाही असा सवाल गडप्रेमींनी केली आहे. तुम्हाला संवर्धन करता येत नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्याला ही नावं का दिली आहेत असा सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे. पोलिसांकडून आदोलकांना थांबवण्यात आलं असून आंदोलकांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या आंदोलनाला पूर्णविराम देण्यात आला. एकनाथ शिंदे आझाद मैदान जवळ येथे उपस्तिथ राहून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाईल असे आश्वासन दिले.

भारत क्रिकेट संघाला धक्का, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी ‘या’ खेळाडूला गंभीर दुखापत

चाफेकर चौकात आंदोलकांचा ठिय्या

फोर्ट येथील चाफेकर बंधू चौकामध्ये सगळे आंदोलन जमा झाले होते. आणि संपूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आला होता. या सर्व आंदोलकांना पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आंदोलक ऐकायला तयार नाहीत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरू केल्या सर्व आंदोलकांना आझाद मैदानात जाण्यास पोलीस विनंती केली, मात्र आंदोलक ऐकायला तयार नव्हते. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यातून जास्त शिवप्रेमी आंदोलनासाठी जमले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इथे बोलवावे त्यांना निवेदन द्यायचे आहे, अशी आंदोलकांची मागणी करत होते. काही वेळाने मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देत त्यांचा मागणीचा विचार करता स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाईल अशी हमी दिली.

Chandigarh University Case : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित MMS लीक, पोलिसांची चौकशी सुरु

Latest Posts

Don't Miss