संजय राऊतांच्या त्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंना काढावी लागली समजूत

इतकेच नव्हे तर त्यांच्या या वक्तव्यामुळे चक्क ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांची समजूत काढत मध्यस्ती करावी लागली आहे.

संजय राऊतांच्या त्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंना काढावी लागली समजूत

ठाकरे गटांचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या वकव्यामुळे सतत चर्चेत असतात आणि आतासुद्धा त्यांच्या असाच एका वादग्रस्त ते पुन्हा चर्चेत आले आहेत आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या या वक्तव्यामुळे चक्क ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांची समजूत काढत मध्यस्ती करावी लागली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

सोमवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोरोनासारख्या बिकट काळात डॉक्टर्स आणि नर्स लोकांसाठी देवदूत ठरले. त्यांनी स्वतःची, त्याच्या कुटुंबाची पर्वा न करता अनेकांचा जीव वाचवला आहे. पण,पुढे संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे डॉक्टर आणि नर्सेसना काहीसे नाराज करणारे होतं. ते म्हणाले की, महामारीच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर आणि नर्सेस आपल्या जबाबदारीपासून पळून जात होते.

संजय राऊत यांनी डॉक्टर आणि नर्सेस बाबत केलेल्या या वक्तव्याचा आता सर्वत्र निषेध केला जात आहे. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत आणि त्याच्या वकव्याबाबत डॉक्टर्स आणि विविध वैदकिय संस्थांकडून निषेध केला जात आहे. आयएमए संघटनेने देखील या वकव्याचा निषेध केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या कल्याण येथील पदाधिकाऱ्याशी संपर्क साधत कल्याण आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर हा विषय थेट उध्दव ठाकरेंकडे पोहोचल्यावर खुद्ध उद्धव ठाकरेंनी डॉक्टरांची समजूत काढत मध्यस्ती केली आहे. उद्धव ठाकरेंनी समजूत काढल्यावर, आम्हाला डॉक्टर आणि नर्स यांच्याबद्दल नितांत आदर आहे. कोरोनावर मात मी मुख्यमंत्री असताना डॉक्टर आणि नर्स यांच्या साहाय्यानं करू शकलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि आमची समजूत काढली अशी माहिती कल्याण आयएमए अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली.

हे ही वाचा:

देशातील आर्थिक, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीच काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’, अतुल लोंढे

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाला? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version