spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईत मोदींच्या दौऱ्यादरम्यान एन एस जीचा आयडी कार्ड घालून घुसखोरीचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गुरुवारी बीकेसी मुंबई (BKC Mumbai) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा झाली होती. या सभेमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळेस एक ३५ वर्षीय व्यक्ती व्हीआयपी गेट मधून मैदानात जात होता. त्यावेळेस पोलीस सुरक्षा रक्षक पथकाने चौकशी केली असता. त्या व्यक्तीने तो राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) च्या नावाचे ओळखपत्र दाखवत ते एनएसजी अधिकारी असल्याचे त्यांनी सुरक्षा रक्षकांना सांगितले. त्यावर सुरक्षा रक्षकांनी पडताळणी केली असता ते ओळख पत्र बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या ३५ वर्षीय आरोपीचे नाव हे रामेश्वर मिश्रा (Rameshwar Mishra) असे आहे. गुरुवारी मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेदरम्यान रामेश्वर मिश्रा (Rameshwar Mishra) हे व्हीआयपी एंट्रीमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते . त्यावेळेस एमएमआरडीए मैदानावर एंट्री पॉईंटचे व्यवस्थापन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने मिश्रा यांना अडवले.त्यावेळेस मिश्रा यांनी त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) च्या नावाचे ओळख पत्र सुरक्षा कर्मचाऱ्यांना दाखवले. पोलिसांनी प्रोटोकॉलनुसार त्याचे परीक्षण केले आणि पोलिसांच्या लक्षात आले की ते ओळखपत्री २०२२ ते २०२५ पर्यंत वैध होते. तथापि, या तारखा कार्डवर पूर्वी असलेली काही गोष्टींमध्ये बदल केला गेल्यासारखे आढळले होते.तसेच कार्ड जोडलेल्या रिबिन्वर ‘दिल्ली पोलिस सुरक्षा असे लिहिलेले होते. म्हणून पोलिसांचा रामेश्वर मिश्रा यांच्यावर असलेला संशय अजून वाढला.

नंतर पोलीस पथकाने रामेश्वर मिश्रा (Rameshwar Mishra) यांना बाजूला नेले आणि त्यांची विचारपूस केली. त्यावर रामेश्वर मिश्रा यांनी ते गार्ड्स रेजिमेंटमध्ये रेंजर असल्याचे संगितले आहे. आणि सध्या ते पठाणकोटमध्ये (Pathankot) तैनात असल्याचे सांगत. त्यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीत NSG सोबत प्रतिनियुक्तीवर काम केले होते, तेव्हाच त्यांनी कार्ड मिळवल्याचा दावा त्यांनी केला. पण पोलिसांना रामेश्वर मिश्रा हे त्यांचे भारतीय सैन्यात असल्याचे ओळखपरत्र देऊ शकले नाही आहेत. आणि दिल्ली पोलिसांच्या रिबनचे स्पष्टीकरणही देऊ शकला नाही आहेत. रामेश्वर मिश्रा याला न्यायालयाकडून २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हे ही वाचा:

Union Budget 2023, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरु होऊन ‘या’ दिवशी होईल सादर

जैन मंदिराच्या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss