spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवतीर्थ नव्हे तर आता ‘या’ ठिकाणी होणार शिंदे गटाचा दसरा मेळावा

"जर तिथे जागा मिळाली नाहीतर बीकेसी मैदानावर करू,"

शिवसेनेतुन बाहेर पडल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटात कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून वाद सुरुच असतात. सध्या शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरूय तो ‘दसरा मेळाव्याच्या’ मुद्द्यावरून. यावेळी शिवतीर्थवर नक्की कोण दसरा मेळावा घेणार शिवसेना कि शिंदे गट हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र या वादाला नवं वळण देणारी एक महत्त्वाची बाब आता समोर येतेय आणि बाब म्हणजे “जर तिथे जागा मिळाली नाहीतर बीकेसी मैदानावर करू,” अशी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (bharat gogavale) यांनी दिलेली माहिती.

‘दसरा मेळावा संदर्भात आम्ही तयारीला लागलो आहे. शिवाजी पार्क किंवा बिकेसी मैदानावर करू, या संदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. यामध्ये ठरेल. पण प्रथम प्राधान्य शिवाजी पार्कमध्ये असणार आहे, असं गोगावले यांनी सांगितलं. ‘आम्हाला जिथे जागा मिळेल तिथे आम्ही मेळावा करू, बाळासाहेब यांचे विचार दाखवून देऊ, कोणाला बोलवायचं हे उद्याच्या बैठकीत ठरेल, असंही गोगावले यांनी स्पष्ट केलं.

‘आमदार सदा सरवणकर यांनी काल सांगितले आहे की मी गोळीबार केलेला नाही. अशी घटना घडू नये यासाठी सदा सरवणकर यांनी खंत व्यक्त केली आहे. एफआयर दाखल झाला आहे त्यात स्पष्ट होईल, असंही गोगावले म्हणाले.मनसेसोबत युती करायची की नाही, या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. अनेकजण आरोप करत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मला याची वस्तुस्थिती माहीत नाही त्यामुळे मी यावर बोलणार नाही, सभा तर होऊ द्या मग पाहू, असंही गोगावले म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे. या बैठकीत दसरा मेळाव्या संदर्भात पूर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

हे ही वाचा:

गुहाघरमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक, २५ ते ३० प्रवासी जखमी

टॅक्सी संघटनेकडून भाडेवाढीसाठी संपावर जाण्याचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss