दसरा मेळाव्यावरुन BMC वर वाढला दबाव

दसरा मेळाव्यावरुन BMC वर वाढला दबाव

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आणि शिवसेनेत दोन गट झाले. शिवसेनेची एवढ्या वर्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा कोणाचा होणार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु झाली. दसरा मेळाव्यासाठी पहिला अर्ज शिवसेनेकडून गेला त्यानंतर शिंदे गटाने सुद्धा दसरा मेळावासाठी अर्ज केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन आता मुंबई महापालिकेवर दबाव वाढला आहे. कारण शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य यांनी महापालिकेला एक पत्र लिहून परवानगी का देण्यात येत नाही, याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याची मागणी केली आहे.

शिंदे गट आणि शिवसेना गट असे दोन्ही गट दसरा मेळावा आमचा होणार असा दावा करत आहेत. पण यासाठी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या गटानं महापालिकेकडे परवानगी मागितली होती. पण त्यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याचाच जाब विचारण्यासाठी दादर विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद वैद्य, महेश सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले आहे. त्या पत्रकमध्ये आम्ही आधी अर्ज केलेलं असतानाही परवानगी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आयुक्तांनी उत्तर दिलं की, हे सर्व प्रकरण विधी व न्याय विभागाकडं आहे. त्यामुळं याबाबत आमच्याकडे कोणताही निर्णय झालेला नाही. यावर शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी या पत्रामार्फत आयुक्तांना थेटपणे विचारलं की तुम्ही आम्हाला लेखी उत्तर द्यावं. कारण जर आम्हाला कोर्टात जावं लागलं तर महापालिकेचं अधिकृत दाखला आम्हाला देता येईल.

माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य म्हणतात, दरवर्षी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. आम्ही पत्र दिल्यानंतर आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं की, संध्याकाळपर्यंत तुम्हाला परवानगी देण्यात येईल. पण आज इतके दिवस झाले तरी अनेकदा चौकशी केल्यानंतर आम्हाला काहीच प्रत्युत्तर आलेलं नाही. त्यामुळं आम्ही आता त्यांना थेट विचारलं. त्यावर त्यांनी हे प्रकरण विधी खात्याकडे असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

“चित्ता आणा किंवा सिंह, आम्हाला आमच्या हक्काचा वाटा हवा” बागचा ग्रामस्थांचा त्यांच्या हक्कांसाठी लढा

…म्हणून चित्त्यांसाठी करण्यात आली मध्यप्रदेशातील ‘ कुनो ‘ ठिकाणाची निवड

PM Narendra Modi Birthday 2022 : पंतप्रधानांच्या ७२ व्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छांचा वर्षाव, वाचा कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version