दसरा मेळावा शिवतीर्थावरच परवानगी मिळो वा न मिळो – मिलिंद वैद्य

दसरा मेळावा शिवतीर्थावरच परवानगी मिळो वा न मिळो – मिलिंद वैद्य

सध्या शिवसेना आणि शिंदे गटात दसऱ्या मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने शिवाजी पार्कमध्ये दसऱ्या मेळाव्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. त्यात शिंदेगटाला बी.के.सी मैदानावर परवानगी मिळाली पण शिवसेनेला अजून परवानगी मिळालेली नाही. शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी आज दसऱ्या मेळाव्या संदर्भात वॉर्ड ऑफिसरशी चर्चा झाल्याचं समोर येत आहे. चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना मिलिंद वैद्य यांनी सांगितलं, पालिकेने अजून ठोस भूमिका घेतलेली नाही. दसऱ्या मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दखल करून १ महिना होत आला. तरी अजून पालिकेकडून ठोस उत्तर किंवा निर्णय दिला नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळो वा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार असे मिलिंद वैद्य यांनी सांगितले आहे.

मिलिंद वैद्य पुढे म्हणाले की, “शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा महापालिकेवर दबाव आहे. २२ ऑगस्ट रोजी अनिल देसाई यांनी पालिकेमध्ये दसऱ्या मेळाव्या संदर्भात परवानगी अर्ज दाखल केला होता. १ महिना उलटून गेल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार हा प्रश्न सर्वांचं पडला आहे. आज मिलिंद वैद्य यांनी विश्वास व्यक्त केला की दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. परवानगीसाठी मागणी करून १ महिना उलटून गेला, तरीही परवानगी नाही दिली. आम्ही आमची डोकी गरम करून घ्याची का? सरकार कायदा आणि सुवेवस्था बिघडण्याची वेळ पहात आहे का ? असा प्रश्न मिलिंद वैद्य यांनी विचारला.

आधी शिवसेनेला दसऱ्या मेळाव्याची परवानगी २ ते ३ दिवसात मिळायची पण शिवसेना फुटीनंतर शिवसेनेला १ महिन्या पेक्षा अधिक कालावधी लागत आहे. मिलिंद वैद्य म्हणाले की, “महापालिकेला परवानगी द्यायची असो वा नसो, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार. उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी शिवसैनिक एकत्र जमतील आणि दसरा मेळावा पार पडेल.”

हे ही वाचा:

Ind vs Aus T20 : भारत ऑस्ट्रेलिया आज आमने सामने

दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाला धक्का, बंडानंतर पहिल्यांदाच गटप्रमुखांना उद्धव ठाकरे संबोधणार

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version