spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार – किशोरी पेढणेकर

सध्या महाराष्ट्रात दसऱ्या मेळाव्यावरून जोरदार रस्सीघेच ही सुरु आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिनी नाही.

सध्या महाराष्ट्रात दसऱ्या मेळाव्यावरून जोरदार रस्सीघेच ही सुरु आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिनी नाही. या दोन्ही गटांसाठी मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) तसेच शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून कोणालाच दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आले आहे.

शिंदे गटाला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये परवानगी मिळालेली असतानाही शिवाजी पार्कसाठी परवानगी मागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मानायचं मात्र शिवसेनेची गळचेपी करायची, पक्षातील दलबदलू लोकं आज आमदार-खासदार झाले, ते बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय. भाजपामध्ये सुद्धा अनेक चेहरे आहेत. पण त्यांच्या नावाने मतं मिळणार नाही अस जेव्हा त्यांना वाटायला लागलं तेव्हा बाळासाहेबांचे विचार पुढे केले जात आहे असा आरोप पेडणेकर यांनी शिंदे गट तसेच भाजपावर केला. त्यामुळे रडी आणि कळीचा डाव खेळला जातोय. हा डाव भाजपच्या माध्यमातून खेळला जात आहे. शिवसेनेसाठी शिवतीर्थ हा परंपरेचा भाग आहे. कोविडची २ वर्षे सोडली तर गेली ५६ वर्षे दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असे समीकरण आहे. मात्र कालच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर लगेच मनपाने आज परवानगी नाकारली.

शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार असे सांगत शिंदे गटाला आव्हान केले आहे. तर पेडणेकर यांनी शिंदे गट रडीचा डाव खेळत आहेत, हा डाव भाजपाच्या माध्यमातून खेळला जातोय अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबई पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे

हे ही वाचा:

शिवसेनेला आणखी एक धक्का; मुंबई पालिकेनं दोन्ही गटांची परवानगी…

Shivsena Dasara Melava : आज हायकोर्टात शिंदे-ठाकरे सुनावणी, शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss