spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज ईडी चौकशी

मागील महिन्यात सलग पाच दिवस कॉंग्रेस नेते राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीद्वारे चौकशी करण्यात आली होती.

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीद्वारे मागील महिन्यात चौकशी झाली होती. तर आज 21 जुलै रोजी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीसमोर चौकशी होणार आहे. सोनिया गांधींना पाठिंबा दर्शविण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील महिन्यात सलग पाच दिवस कॉंग्रेस नेते राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीद्वारे चौकशी करण्यात आली होती. तर कोरोना संसर्ग आणि आजारपणामुळे सोनिया गांधी या त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाही. यामुळेच आज सोनिया गांधी ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

हेही वाचा

रेल्वेचा मोठा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना भाडेदरात मिळणारी सवलत केली जाणार रद्द…

या प्रकरणात काँग्रेसने हा प्रयत्न राजकीय सुडाचा असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे माध्यम विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी या प्रकरणावर ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध निदर्शनांची त्यांनी घोषणा केली आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते विविध राज्यांच्या राजधान्यांमधून येत ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. राष्ट्रीय राजधानीतील काँग्रेसचे प्रमुख नेते आंदोलनासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात एकत्र येणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा

पावसाळ्यात प्रत्येकाने सोबत ठेवाव्यात अशा काही महत्त्वाच्या वस्तू

याच प्रकरणी जूनमध्ये ईडीने राहुल गांधींची अनेक दिवस चौकशी केली तेव्हा खासदारांसह काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी याबाबत निदर्शने केली. ईडीने यापूर्वी 23 जून रोजी सोनिया गांधी यांना दुसरे समन्स बजावले होते, परंतु कोविड आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने त्या त्यावेळी हजर राहू शकल्या नाहीत.

 

Latest Posts

Don't Miss