दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयावर ईडीचा छापा

दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयावर ईडीचा छापा

दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयावर ईडीचा छापा

नवी दिल्ली : ईडीच्या पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून सध्या तिथे कागदपत्रांची शोध मोहीम सुरु आहे. या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : 

गद्दारांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत, आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा

नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर ईडीने छापे मारले. या दरम्यान आणखी 10 ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम सुरु आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या ठिकाणांवर छापेमारी होऊ शकते. ईडी सध्या नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनच्या ऑफिस हेराल्ड हाऊसमध्ये छापा मारला जात आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्काराची मागणी असताना, करीना कपूर म्हणाली…

Exit mobile version