spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली जितेंद्र आव्हाडांवर टीका

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) त्यांच्यात अनेक वाद सुरु आहेत.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) त्यांच्यात अनेक वाद सुरु आहेत. त्यातच आता हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांवर एकेरी टीका केली आहे. भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच आव्हाडांना पक्षात कोणीही विचारत नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट झाला आहे, असे मुश्रीफ म्हणाले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. आरोप करतेवेळी मुश्रीफ आव्हाडांवर यांनी एकेरी शब्दात टीका केली आहे.

आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या सोबत जावे यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी आमदारांनी सह्या केल्या त्या पेपरवर जितेंद्र आव्हाडांची सही एक नंबरला होती. आम्ही भाजप सोबत जाणार त्यावेळी झालेल्या चर्चेत जितेंद्र आव्हाड नव्हते. माझा भाजप सोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का?असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल. राजकीय वैमनस्ये नसून वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी हे समजून घ्यायला हवं आपले वैर नाही शेतीमातीचे भांडण नाही. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही, त्यामुळे आम्हाला निधी दिला जात नाही, अशा पद्धतीने वागवल जात आहे. आम्हाला एक रुपया निधी देखील दिला नाही.आम्हाला मुख्यमंत्री यांनी निधी वाटपासाठी वेळ दिला, पण तो लॉबीत दिला. विरोधी पक्षाची लायकी लॉबीत आहे, हे त्यांनी दाखवून दिले. चाळीस वर्ष ज्यांनी विधिमंडळात काम केले, त्यांना निरोप आला की, लॉबीत येऊन भेटा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा:

वंदे भारतमुळे मुंबई लोकल सेवेला बसणार फटका

प्रिय लोकशाही , नक्की काय म्हटलंय सुषमा अंधारेनी पत्रात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss