spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

… ‘एक’ साहेब आणि ‘एक’नाथ साहेब, मनसेचं ट्विट प्रचंड चर्चेत

सर्व ठिकाणी गणरायाचे आगमन हे झाले आहे. अनेक नेतेमंडळीच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांच्या घरी देखील पहिल्यांदाच गणरायाचे आगमन हे झाले आहे.

सर्व ठिकाणी गणरायाचे आगमन हे झाले आहे. अनेक नेतेमंडळीच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांच्या घरी देखील पहिल्यांदाच गणरायाचे आगमन हे झाले आहे. काल दि. २ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister of the state Eknath Shinde)  यांनी गणेशोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांचा फोटोही मनसेच्या नेत्यांकडून शेअर करण्यात आला आहे.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमनातरी एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या भेटीमुळे अनेक चर्चाना उधाण आले होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांचा फोटोही काढण्यात आले आणि तो फोटो देखील तुफान वायरल झाला होता. या फोटोच्या वेळी मागच्या भिंतीवर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचे फोटोही दिसत आहेत. याच फोटोच्या अनुषंगाने मनसे नेते अमेय खोपकर, आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

 आपल्या सोशल मीडिया पोस्टवर मनसे नेते म्हणतात की, प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब. विचारांचा वारसा परफेक्ट ‘क्लिक’ झालाय. ‘एक’ साहेब आणि ‘एक’नाथ साहेब. #श्रीगणेशा #बाप्पा_मोरया. हा फोटो पाहून आता चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून सातत्याने राज ठाकरे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच वारसा वास्तूंचा नसतो, विचारांचा असतो, हे वाक्य गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून सातत्याने बोललं जात आहेत. त्याच अनुषंगाने आता मनसे नेत्यांनी ट्वीटही केले आहेत. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा असं म्हणत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत – नरेंद्र मोदी

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss