गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद दिघे यांना एकनाथ शिंदेंकडून अभिवादन

गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद दिघे यांना एकनाथ शिंदेंकडून अभिवादन

ठाणे : आज गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मृतींना अभिवादन करून पुढे धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात पोहोचले. आजचा दिवस गुरु – शिष्यासाठी खास आहे. याच दिवसाला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रमात दाखल झाले. गुरू शिष्याची परंपरा जोपासण्यासाठी एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना वंदन करण्यासाठी पोहोचले. Eknath Shinde at Anand Ashram

ठाण्यात शिवसेना पक्ष वाढीस आणण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांनी केलं. त्यांच्याच तालमीत तयार झालेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने आनंद आश्रमात पोहचून धर्मवीर आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेतले. या निमित्ताने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदा गुरू पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतला.

हेही वाचा :

गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांना शिंदेंकडून अभिवादन

 

आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी लिहिले, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन. याबरोबरच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही शेअर केला आहे.

 

Exit mobile version