Sunday, July 7, 2024

Latest Posts

“माझ्या यशाच्या मार्गात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा आहे ” – Raksha Khadse यांचे बोल

"माझ्या यशाच्या मार्गात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा आहे . मला अतिशय आनंद होत आहे की माझी निवड केंद्रीय मंत्रिपदासाठी झाली. मी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणार आहे असा विचारसुद्धा केला नव्हता."

आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. यातच मंत्रिपद विस्तार होणार आहे. या मंत्रिपद विस्तारासाठी महाराष्ट्रातून एकूण ६ मंत्र्यांच्या जागा निश्चित झाल्या आहेत. यासंदर्भात पियुष गोएल (Piyush Goyal), रामदास आठवले (Ramdas Athavle), मुरलीधर मोहोळ(Murli Mohoal), प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची नावे जाहीर झाली आहेत. त्यापैकी रक्षा खडसे या सुद्धा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा एक महत्वाचा भाग बनणार आहेत. आज रक्षा खडसे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील. रक्षा खडसे यांच्या निवडीमुळे संपूर्ण रावेर पक्षांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. एका अर्थी रक्षा खडसे यांना लॉटरीच लागली आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही अगदी सरपंच पदापासून केली होती.

NDA सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याच सोबत बुलेट ट्रेनचे पायलटस (Loco Pilot)  यांना सुद्धा आग्रहाचे निमंत्रण मिळाले आहे. खानदेश रावेर यांची सून आणि खासदार रक्षा खडसे या आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. रक्षा खडसे यांचे सासरे राष्ट्रवादीत (Indian Notional Congress) आहेत परंतु त्यांची निष्ठाही कायम भाजपावरच (BJP) आहे. कारण भाजप मध्ये त्यांनी स्वतःचे स्थान स्वतः पटकावले आहे. मुख्य म्हणजे खडसे कुटुंबाचे मूळ हे जळगावपासून सुरु आहे. तेथे त्यांचे राजकीय वर्चस्व विशेष आहे. गेल्यावर्षी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडले राजकीय वर्तुळात रक्षा खडसेसुद्धा भाजप सोडतील याबद्धल अनेक चर्चा रंगल्या होत्या,परंतु त्यावेळी त्यांनी असे स्पष्ट केले की –

“मी भाजप सोडणार नाही . सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) त्यांना पक्षामध्ये त्रास होत असल्याने ते पक्षाच्या बाहेर पडले आहेत. मला कोणत्याही प्रकारचा त्रास पक्षात होत नाही “

२०१४ रोजी रक्षा खडसे पहिल्यावहिल्या खासदार झाल्या. त्यांनतर २०१९ रोजी त्या पुन्हा दुसऱ्यांदा खासदार म्हणून जिंकल्या. तर २०२४ रोजी त्या पुन्हा तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आणि आता थेट त्या केंद्रीय मंत्री होणार आहेत. याप्रसंगी त्यांचे सर्व कुटुंबीय दिल्ली येथे रवाना झाल्याची माहीती मिळते आहे. या महत्वपूर्ण प्रसंगाविषयी त्यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की –

“माझ्या यशाच्या मार्गात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा आहे . मला अतिशय आनंद होत आहे की माझी निवड केंद्रीय मंत्रिपदासाठी झाली. मी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणार आहे असा विचारसुद्धा केला नव्हता.”

मात्र आता रक्षा खडसे या कोणता पदभार स्वीकारणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचा जन्म १२ मे १९८७ मध्ये झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्या एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे यांच्या सोबत एका प्रेमळ बंधात जोडल्या गेल्या. काही काळानंतर निखिल खडसे (Nikhil Khadse) यांची आत्महत्या हे त्यांच्या समोरील सर्वात मोठे वादळ होते. त्यांच्यानंतर रक्षा खडसे या राजकीय क्षेत्रात उतरल्या. विशेष म्हणजे त्यांनी त्यांची पहिली निवडणूक ही कोथळी (Kothali) या ग्रामपंचायतीतून लढवली आणि त्यातूनच त्यांचा राजकीय क्षेत्रातील सरपंच असा प्रवास सुरु झाला. यांचे शिक्षण हे बीएससी (B.SC) पर्यंत झाले आहे. त्यांनंतर २०१० पासून भारतीय जनता पक्षात आपले काम त्यांनी सुरु केले. जिल्हा परिषदांच्या निवडणूक लढवून त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केले. रक्षा खडसे यांचा तगडा जनसंपर्क आहे. ज्याचा फायदा त्यांना या लोकसभा निवडणुकीत सुद्धा झालेला आपण पाहीला आहे. २०१४ मध्ये मनीषा जैन (Manisha Jain) यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती त्या निवडणुकीत त्यांनी मोठे यश संपादन केले. पतिच्या निधनानंतर रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व स्वबळावर मिळविले. जीवनातील प्रत्येक वादळात रक्षा खडसे अगदी खंबीरतेने उभ्या राहिलेल्या दिसल्या आहेत.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट; सत्तास्थापनेचं दिलं आमंत्रण

वरिष्ठ नेत्यांनी PANKAJA MUNDE यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून सुचवावे..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss