Mahayuti चे सरकार जाऊन Mahavikas Aghadi चं सरकार यावं, Eknath Khadse यांचं मोठं वक्तव्य

Mahayuti चे सरकार जाऊन Mahavikas Aghadi चं सरकार यावं, Eknath Khadse यांचं मोठं वक्तव्य

आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठे वक्तव्य केले असून महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार यावं असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024)  अनुषंगाने महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमधे चुरशीची लढत होणार असून त्या अनुषन्गाने दोन्हीही युती आणि आघाडी कसून तयारीला लागले आहेत. अश्यातच भाजपचे माजी नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हे मोठे विधान केल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसांत महायुतीचा अनुभव चांगला वाटत नसून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

महायुतीचे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे

आमदार एकनाथ खडसे म्हणाले,” राज्यात आगामी विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटत. मागच्या काही दिवसांतील, काही महिन्यांतील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाहि. महायुतीचे सरकार आल्यापासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुद्धीने ईडी, सीबीआयसारख्या कारवाया करत आहेत. उट्टे काढण्याचे काम करत असल्याने जनतेची कामे होत नाहीत. लाडकी बहीण योजनेला ४६ हजार कोटी द्या आणि त्यासोबतच ४६ हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्यावी म्हणजे त्यातून स्थायी मालमत्ता निर्माण होईल. त्यामुळे हे सरकार जावे आणि महाविकास आघाडीचे सरकार यावे असे वारंवार वाटत आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणली 

लाडकी बहीण योजेबाबत भाष्य करत ते पुढे म्हणाले, “लाडकी बहीण योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने आणली असल्याचे आता जनतेलाही काळात आहे. हि योजना जर आणायचीच होती तर पाच वर्षांपूर्वी आणायला पाहिजे होती. या योजनेला आपला विरोध नाही. मात्र इकडे केलेला खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे. एवढाच खर्च जर धरणे उभारणी, रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार निर्माणही होऊ शकणार आहे, त्यासाठीही प्रयत्न करायला हवं, असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

माझं डोकं फिरवू नका, तुमच्यात एवढी खुमखूमी असेल तर… राऊतांची Manoj Jarange Patil यांच्यावर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version