एकनाथ शिंदे, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील जरांगेंची घेणार भेट

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षण मुद्द्यावर अनेलक राजकारणी लोकांनी मनोज जरंगे पाटील यांची येऊन प्रत्यक्ष भेट घेतली. तरी देखील मनोज जरंगे हे त्यांच्या मतावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणाविषयी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज संध्याकाळी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळातील या तीन बड्या मराठा मंत्र्यांच्या समजुतीनंतर तरी जरांगे उपोषण मागे घेतात का?हे पाहणे म्हतवाहचे ठरणार आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या या भेटीनंतर राजकारणात नवीन कोणते नाट्यप्रकार घडणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज बुधवार संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकात पाटील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात जाऊन जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी प्रयत्न करणार आहेत. कारण जरांगे यांच्या बहुतांश मागण्या सरकारनं आधीच मान्य केल्या आहेत. तसेच काही अटीशर्तींनुसार पुढील कार्यवाही होणार आहे. दरम्यान, जरांगे यांना हे तीन मराठा नेते त्यांच्या भेटीसाठी येत आहेत याची कल्पना देण्यात आलेली नाही. माध्यमांनी विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. मला अधिकृत कोणाचाही फोन आला नाही उलट मीडियाच्या माध्यमातूनच मला ही माहिती मिळते आहे. पण त्यांना जर समाजाला संबोधन करायचं असेल त्यासाठी जर ते भेटीसाठी येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मंगळवार मंत्री उदय सामंत, संदिपान भुंमरे, आमदार राजेश टोपे, अर्जुन खोतकर, नारायण कुचे यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. या ठिकाणी चर्चेदरम्यान मार्ग निघेल असं वाटत होतं, पण मुख्यमंत्र्यांनी इथं यावं असं जरांगे यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथं आल्यावरच उपोषणाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असं जरांगे यांनी बुधवार अंतरवाली सराटी इथं सांगितलं होतं. जरांगे यांचा उपोषणाचा आजचा १५वा दिवस आहे. मनोज जरंगे यांनी एक महिन्याची मुदत दिली होती. त्या मुदतीच्या आधारे आज संध्याकाळी बडे मंत्री भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान त्यांच्या मध्ये नेमके कोणत्या प्रकारचा चर्चा किंवा तोडगा निघणार आहे तसेच नक्की निर्णय काय दिला जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा: 

डोंबिवली लोकलमधील महिला डब्यात एका वेळेस दोन ते तीन पुरूष फेरीवाल्यांची घुसखोरी…

आमदारांच्या पात्र अपात्रतेवर उद्यापासून होणार सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version