spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गोपीकिशन बाजोरिया ह्यांची संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानाचा मोठा निर्णय

अकोल्यामध्ये पक्षाचा विकास होण्या ऐवजी अंतर्गत वादच वाढीस लागले आहे , त्याचा परिणाम पुढे येणाऱ्या निवडणुकीत होऊ शकतो म्हणूं एकनाथ शिंदे धाडसी निर्णय घेत आहेत त्यांनी नुकतेच अकोल्याचे संपर्क प्रमुख ह्या पदावरून गोपीकिशन बाजोरिया ह्यांना हटवल आहे. अकोल्यामध्ये पक्षाअंतर्गत वाद वाढीस लागले आहे ,एकमेकांवर आरोप करणे , पोलिसांकडे तक्रारी करणे , एकमेकांच्या घरावर हल्ला करणे असे प्रकार होत आहेत. ह्या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी अकोल्याचे संपर्क प्रमुख ह्या पदावरून बाजोरिया यांना हटवून त्या जागी आता बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव याना घेण्यात आले . गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे माजी आमदार आहे त्यानंतर त्यांच्या शिंदे यांनी समोरप्रमुखाची जबाबदारी सोपवली ,पण त्यात ते काम व्यवस्थि करत नाही अशी तक्रार वारंवार येऊ लागली त्यात त्यांचे पक्षाच्या इतर अधिकाऱ्यांसोबत वाद वाढू लागले.

 

मुख्यमंत्री ह्यांनी अकोल्याच्या विकासासाठी १५ कोटी इतका निधी दिला होता परंतु तो निधी योग्य रित्या वापरला ना गेल्याचा आरोप गोपीकिशन बाजोरिया ह्यांच्यावर केला गेला आहे, तसेच बाजोरिया ह्यांनी पदाधिकार्यांचा निधी स्वतःच अलाटल्याचा सांगण्यात येत आहे त्यामुळे इतर पदाधिकारी त्यांच्यावर नाराज आहेत. एवढंच नाहीतर विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पात्रात गोपीकिशन ह्यांच्या उल्लेख कमिशन एजन्ट असा केला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांची टाकणार आहे कि बाजोरिया हे स्वतःच्या जवळच्या माणसांना पक्षात मन देतात. ह्या सर्व गंभीर आरोपांमुळेच एकनाथ शिंदे ह्यांनी गोपीकिशन बाजोरिया ह्यांची उचल बांगडी केली आहे. लोकांच्या विकासात जे आड येतील त्यांची अशीच उचला बांगडी करण्यात येणार आहे असं शिंदे ह्यांचा मत आहे .

नेमके काय वाद आहेत गोपीकिशन बाजोरिया आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये –
अकोला जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप आणि बाजोरिया ह्यांच्यात वाद आहे, हेवाद आता घर पर्यंत पोच ला आहे. विठ्ठल सरप ह्यांच्या सहकारनगर भातील घरावर हल्ला करण्यात आला त्यात सरप यांच्याशी धक्का बुक्की करण्यात आली . ह्याची तक्रार सरप यांनी खदान पोलीस स्टेशन मध्ये केली आहे . या सर्व वादाची सुरुवात झाली ती म्हणजे संदीप पाटील ह्यांच्या पक्ष प्रवेश नंतर. संदीप पाटील हे शिवसंग्राम मध्ये होते . विठ्ठल सरप आणि संदीप पाटील हे दोघंही एकाच मतदार संघातले आहेत . बाजोरिया ह्यांनी विठ्ठल सरप ह्यांच्यावर कुर्घोडी करण्यासाठी संदीप ह्यांना पक्षात आणल्याचं बोललं जात. परंतु हा प्रवेश बाजोरिया ह्यांनी केला नसल्याच बाजोरिया ह्यांचे समर्थक सांगतात. उलट विठ्ठल सरप आणि अश्विनी नवले ह्यांना पुढे करून बाजोरिया ह्यांच्यावर अन्याय होता असलयच देखील त्यांचे समर्थक सांगतात.

हे ही वाचा :

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss