राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; आज ७:३० वाजता होणार शपथ विधी

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा केली आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; आज ७:३० वाजता होणार शपथ विधी

काल महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आज दिवसभरात भाजप कडून नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाल सुरु करण्यात आली होती. शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदारांसोबत एकनाथ शिंदे हे आधी सुरत, गुवाहाटी काल गोव्यात पोहोचले. आज एकनाथ शिंदे तब्बल १० दिवसांनंतर मुंबईत परतले आहेत. एकनाथ शिंदे हे आधी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले होते. दहा – पंधरा मिनिट त्यांच्यात चर्चा झाली त्यानंतर दोघांनी ही एकत्र राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. दोन्ही गटांनी राज्यपालांकडे महाराष्ट्रतील नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. शपथ विधी सुद्धा आजच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा केली आहे.

शिवसेना विधिमंडळाचा गट आणि भाजप चा विधिमंडळ गट आणि आणखी काही गट एकत्र येत एकनाथ शिंदे यांना भाजप कडून पाठिंबा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळी ७:३० वाजता एकनाथ शिंदे यांचा शपथ विधी सोहळा पार पडणार आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांचा शपथ विधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version