spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोर्टाच्या निकालानंतर ठाकरेंचे पारडे जड तर, शिंदे पितापुत्राच्या जबाबदारीत वाढ

दसरा मेळाव्याला आता आवाज कुणाचा? यासाठी दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गट शिवाजी पार्क तर शिंदे गट बीकेसी एमएमआरडीए मैदानावर सभा घेणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळं दोन्ही मैदानं कार्यकर्त्यांनी तुडूंब भरवण्यासाठी दोन्ही गट तयारी करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतूनच ठाकरे आणि शिंदे गट आपली ताकद दाखवताना, शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहेत. ठाकरे गटाची ही तयारी पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा : 

दापोली समुद्रकिनारी सापडलेल्या बोट संदर्भात तटरक्षक दलाचा खुलासा

४० आमदार घेऊन बाजूला निघालेले एकनाथ शिंदे आपल्या गटालाच खरी शिवसेना मानतात. त्यातच अनेक खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुळ ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पूर्वीपेक्षा अधिक सक्रीय झाले आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे गटाकडून देखील युवासेना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू आहे. याचे संकेत एका खासदाराने केलेल्या मागणीमुळे मिळाले होते. त्यामुळे श्रीकांत शिंदें यांच्याकडे युवासेना प्रमुखपदाची मोठी जबाबदारी जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Airtel Users : दिवाळी आधीच एअरटेलचा धमाका, ‘या’ प्लॅनसह मोफत डिस्ने प्लस व हॉटस्टार सबस्क्रिप्शन

कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या ठाकरे म्हणाले, ‘वाजत – गाजत -गुलाल – उधळत या! पण शिस्तीत या! असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसेनेचे परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यासाठी निमंत्रित केलं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटात एक नवी ऊर्जा, उत्साह संचारला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी जमा होणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान कार्यकर्त्यांनी गच्च भरेल, अशा प्रकारची तयारी आता शिवसेना ठाकरे गटाने केली.

तर यंदा शिवसेनेचे दोन्ही गट दसरा मेळावा घेणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातच श्रीकांत शिंदे यांच्याकडे युवासेना प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात येते का? हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

टेनिसचा बादशाह रॉजर फेडररने अश्रू ढाळत टेनिसला निरोप दिला

Latest Posts

Don't Miss