मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणामुळे सभागृहात हशा पिकाला , नाव न घेता उद्धव ठाकरे ह्यांना टोला

एकनाथ शिंदे हे आज सभागृहात आपल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तर देत होते. त्या वेळेस त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणामुळे सभागृहात हशा पिकाला , नाव न घेता उद्धव ठाकरे ह्यांना टोला

एकनाथ शिंदे हे आज सभागृहात आपल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तर देत होते. त्या वेळेस त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला ,तसेच त्यांनी कसलेल्या राजकारण्या प्रमाणे त्यांनी अनेकांना काळत नकळत चिमटे देखील काढले त्यामुळे सभागृहाचे वाटेवर बदल सर्व ठिकाणी हशा पिकाला होता ,तसाही असे कोपरखळ्या मारत भाषण करणे हे एकनाथ शिंदे ह्यांना नवीन नाही . त्यांच्या या भाषणाला नेहमी प्रमाणेच सत्ताधाऱ्यांकडून साथ मिळाली परंतु विरोधकांनी त्यावेळेस सभागृहात गोंधळ घालण्याचं प्रयत्न केला परंतु सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांनी तास होऊ दिल नाही.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या संदर्भात राष्ट्रवादी कार्यालयामध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला फलक लावला होता आणि तसाच आशयाचे अजून दोन फलक सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील ह्यांच्या संदर्भात देखील लागले होते ,त्याच बद्दल बोलताना शिंदेनी अजित पवारांना नक्की भावी मुख्यमंत्री कोण हे आधी ठराव असा टोमणा मारला .

पुढे अजित पवारांनी केलेल्या आरोपावर शिंदेनी उत्तर दिल. अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर झालेल्या २ कोटी ४० लाख रुपये झालेल्या चहा पाण्याच्या खर्चाचा मुद्दा मांडला होता त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि आमच्या कडे सोन्यासारखी माणस प्रेमाने येतात त्यांना चहा पाणी करायचा नाही का ?ती आपली संस्कृती नाही का? आणि गेल्या अडीच वर्षात वर्षा बंगला बंदच होता ,फेसबुक लाईव्हच चालू होत तरीही चहा पाण्यावर किती खर्च झाला हे तुम्ही पहिला का? असे प्रतिप्रश्न एकनाथ शिंदे ह्यांनी केले . ह्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे ह्यांना देखील टोला लगावला. पुढे ते म्हणले कि कसबा मतदार संघामध्ये कोण जिंकला आणि कोणाला आनंद झाला . बेगानी शादीमे अब्दुला दिवाना असा टोमणा देखील त्यांनी उद्धव ठाकरे याना मारला.

जाहिरातींबाबतीत शिंदे काय म्हणाले?

पवारांच्या प्रश्नाला उत्तर दे शिंदे म्हणाले कि हो आम्ही जाहिरातींवर खर्च करतो पण सरकारी योजनांच्या जाहिराती असतात त्या . आधी तुम्ही पीआर साठी २४० कोटी बाजूला काढले होते स्वतःच्या वयक्तिक पीआर साठी ६ कोटी बाजूला काढले होते ते नंतर परत मागे घेतले . आम्ही सरकारी योजनांच्या जाहिराती देतो तुमच्या सकाळसह सामनामध्ये देखील देतो,मग जर तुम्हाला सरकारच मान्य नसेल तर त्यांच्या जाहिराती आणि योजना कशा काय घेतात ?

Exit mobile version